30.3 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5651

बोदलकसा पर्यटक निवास आजपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू

0

berartimes.com
गोंदिया,दि.२६ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रतिवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिनङ्क म्हणून साजरा करण्यात येतो. ‘‘पर्यटन सर्वांसाठी, प्रचालन सार्वत्रिक प्रवेशाचाङ्कङ्क नुसार महामंडळाने जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा हे नविन पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी शोधलेले असून येथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बोदलकसा पर्यटक निवास जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या पर्यटक निवास बोदलकसाचे दोन मजल्याचे बांधकाम असून पर्यटक निवासात दोन बिछान्याचे ८ व्हीआयपी सूट, दोन बिछान्याचे ८ डिलक्स सूट, दोन बिछान्याचे ८ ए.सी.रुम, दहा बिछान्याचे १ लोकनिवास, आठ बिछान्याचे २ लोकनिवास, उपहारगृह आणि १०० लोकांकरीता कॉन्फरन्स हॉल आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

शिवसेना आमदाराची शेतकऱ्याला मारहाण

0

औरंगाबाद,दि.26: औरंगाबादमधील पैठणचे सेना आमदार संदीपान भुमरेंची शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. साखर कारखान्याच्या सभेत प्रश्न विचारल्यानं तिळपापड झालेल्या भुमरेंनी शेतकऱ्याला मारहाण केली.विशेष म्हणजे आमदारांच्या समर्थकांनीही शेतकऱ्याला चोप दिला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहे.औरंगाबादच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेवेळी जयाजीराव सुर्यवंशी या शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता. यामुळे संतप्त आमदार भुमरेंनी त्या शेतकऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केली.

 

विदर्भात लघुसिंचन योजनांसाठी ५० कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

0
berartimes.com  गोंदिया दि.२6- विदर्भात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेला वादळी वारा आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतीकरीता राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांकरीता राज्य सरकारने ६४ कोटी रूपयांचा विशेष निधी मदत मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना मदत देणाऱ्या शासन निर्णयाची अधिसुचना २० सप्टेंबर रोजी प्रसूत करण्यात आली. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार मंजूर करण्यात आलेला मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत म्हंटले आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे संत्रा, हरभरा, गहू आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात केळी, संत्रा, पपई आदी फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त तालुक्याचे सर्वेक्षणही केले होते. परंतु तब्बल नऊ महिने उलटूनही गारपीटग्रस्तांना मदत मिळू शकली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी संताप व्यक्त केला जाता होता. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे शासनाने नुकतीच २० सप्टेबर रोजी विदर्भातील ८४ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६४ कोटी रुपयांच्या मदतीसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांनी ही मदत लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

इरई धरणाचे सात दरवाजे उघडले, चंद्रपुरात समाधानकारक पाऊस

0

berartimes.com चंद्रपूर,दि.26- गेल्या दोन दिवसभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाचे सात दरवाजे ०.५०, ०. २५ मिमीने उघडण्यात आले. रविवारी पावसाचा जोर होता. त्यामुळे नदी-नाल्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला होता. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर आणि भद्रावती येथे झाली. भद्रावती येथे १५५ मिमी, तर चंद्रपुरात ११९.८ मिमी पावसाची नोंद झाली. परतीच्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर हलक्याप्रतीचा धानाचे नुकसान होणार आहे.
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने शनिवारी जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारपासून पावसाला सुरवात झाली. सायंकाळी पाच वाजता पावसाने जोर पकडला. रात्री उशिरापर्यंत चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस सुरूच होता. सायंकाळी दोन तासांतच ९० मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी पहाटेपर्यंत ११९.८ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. इरई धरणात ९० दलघमी इतका पाणीसाठा आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धरणातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सहाही दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाल्या काठावर राहणाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील सखल वस्त्यांत पाणी साचले होते. त्यात प्रामुख्याने इंदिरानगर, सरकारनगर, रहेमतनगर, सिस्टर कॉलनी याचा समावेश होता. पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, सिंदेवाही, सावली, गोंडqपपरी, पोंभूर्णा, राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यांतही कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीनचा समावेश आहे. परतीच्या पावसाने या पिकांना संजीवनी मिळाली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण

0

अकोला, दि. 26 – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील वसतिगृहांमध्ये सर्व नवीन अप्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनींना तत्काळ प्रवेश, वसतिगृहांची क्षमता वाढविणे तसेच प्रकल्प अधिकाऱ्याची बदली या तीन मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. यावेळी ३४ विद्यार्थी उपोषणास बसले असून, त्यांच्या समर्थनार्थ जवळपास दोन हजार विद्यार्थी उपोषणमंडपात उपस्थित होते.

आमसभा में पदाधिकारी मंडल का गठन

0

berartimes.com
सालेकसा (गोंदिया) दि.२6- सालेकसा तहसील अंतर्गत आनेवाले ग्राम पिपरिया की श्याम सुंदर शैक्षणिक कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या.के वर्ष २०१६ की आमसभा  मूलचंद पटले की अध्यक्षता में हाल ही में संपन्न हुईं । संस्था की प्रति पदाधिकारी मंडल का निर्विरोध गठन किया गया । जिसमे भानपुर हाईस्कुल के अध्यक्ष के रूप में मूलचंद पटले व् सदस्य के रूप में दामोदर बिसेन, मीना शरणागत, पिपरिया हाईस्कुल से महासचिव सी.के.पुस्तोडे , सदस्य वी.एन.शहारे, ए.जे.हरिनखेड़े, विद्या मंदिर पाठशाला पिपरिया के सचिव सी.के.दमाहे ,सदस्य डी.एन.अत्ते. कचारगड़ आदिवासी आश्रम शाला पिपरिया के उपाध्यक्ष बी.एम.मोहारे, जानकी कन्या पाठशाला सालेकसा के सदस्य बी.के.ऊके, सेवानिवृत व् अतिरिक्त कर्मचारी टी.डी.सहारे,आदि का आगामी ५ वर्ष के लिए निर्विरोध गठन किया गया ।

पुणे मे “एस्पायर” कार्यशाला का सफल आयोजन

0

berartimes.com पुणे-क्षत्रिय पवार समाज संघ पुणे द्वारा एक दिवसीय व्यवसाय मार्गदर्शन “एस्पायर” कार्यशाला का आयोजन हाल ही मे 17 सितंबर को सफलतापूर्वक पुणे में किया गया। इस कार्यशाला मे समाज के होनहार युवा बढी संख्या मे सम्मिलीत  हुए थे। कार्यशाला का पूर्ण लाभ युवाओ को नौकरी ढूंढने में होगा। इस एक दिन की कार्यशाला में सम्मिलित युवाओ को विस्तृत ज्ञान,विभिन्न पहलुओं के बारे में जानकारी दि गयी। जैसे,साक्षात्कार कैसे बेहतर ढंग से दे, आप स्वयं का संछिप्त विवरण(बायोडाटा) कैसे बेहतर बनाये, अपनी योग्यता का किस ढंग से उपयोग करे, और इन सभी का नौकरी या व्यवसाय आदि पाने में कितना योगदान होता है इन सभी बातो पर प्रकाश डाला गया।
नौकरी ढूंढने के विभिन्न मार्ग , विभिन्न व्यवसाय, अच्छे व्यवसाय हेतू शिष्टाचार , अपना विकास, अपने सोच को कैसे सकारात्मक रखे। इन सभी विषयों पर विस्तृत में मार्गदर्शन आयोजन समिति द्वारा पिछले कुछ वर्षो से  किया जा रहा है।
“एस्पायर” के प्रथम संस्करण की सफलता के लिए आयोजक समिति के सभी 25 सदस्य पिछले 5 माह से प्रयत्नशील थे। एवं ” एस्पायर” के प्रथम संस्करण एवं प्रथम कार्यशाला का प्रदर्शन सफलता पूर्वक रहा जिसका श्रेय आयोजक समिति को ही जाता है। जिन्होंने इतने बड़े पैमाने पर विशाल सत्र का आयोजन एवं व्यवस्थापन जैसे कार्यक्रम की जगह, समय, सूचि, व्यवस्थित समयसारणी, विज्ञापन, समाज से संपर्क , भोजन प्रबंधन, इन सभी बातों का सफलतापूर्वक नियोजन किया गया एवं कार्यशाला को उचित ढंग से प्रदर्शित किया गया। 2fe3857c-e71e-4f5d-9729-f0ca244201f0
” एस्पायर” का प्रथम संस्करण एवं कार्यशाला पूर्णता निशुल्क रखी गयी,एवं इसका पूर्ण दायित्व आयोजन समिति के सद्स्यो ने स्वयं पर ही लिया। इस कार्यशाला को निशुल्क रखने के पीछे मुख्य उद्देश्य था कि समाज के युवाओं का मार्गदर्शन जो की समाज का भविष्य है, और कोई भी बच्चा आर्थिक समस्या के वजह रहते इस कार्यशाला के लाभ से वंचित न रहे यह ही था। समाज के लिए अपने दायित्व का अहसास ही इस कार्यशाला की नींव थी।
आयोजको का दृढ़ संकल्प है कि, हर शैक्षणिक वर्ष के अंत में याने अगस्त माह में पुणे में इस तरह की कार्यशाला का आयोजन सतत रखा जायेगा।
इसके अलावा भी क्षत्रिय पवार समाज संघ पुणे द्वारा सामाजिक स्नेहसम्मेलन एवं एक वैवाहिक साथी संबंधी ” मिलन” नामक परिचय हेतु एक दिवसीय कार्यक्रम का आयोजन किया गया था। जिसमे समाज के विवाह योग्य युवक एवं युवतियों के लिए उचित जीवनसाथी चुनने मदद सिद्ध हो सके। “मिलन” यह परिचय कार्यक्रम हर वर्ष लिया जायेगा।इस वर्ष के लिए भी भविष्य में ” मिलन” के अगले संस्करण के आयोजन की घोषणा शीघ्र ही कि जायेगी एैसी जानकारी समिती व्दारा दी गयी है।यदि और भी कोई पवार समाज संघ अपने क्षेत्र में ऐसे (एस्पायर/ मिलन)कार्यक्रम करने की मनशा रखते हो और मार्गदर्शन एवं सहयोग की अभिलाषा हो तो आप क्षत्रिय पवार समाज संघ पुणे के सदस्य से संपर्क करे, उन्होंने इस संबंधी विस्तृत सहयोग देने का भरोसा जताया है।

गोंदिया शहर ओबीसी संघर्ष कृती समिती अध्यक्षपदी विष्णु नागरीकर

0

गोंदिया,-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने २४ सप्टेंबरला मयुर लॉन येथे आयोजित ओबीसी संघर्ष कृती समितीच्या जिल्हा बैठकित गोंदिया शहर ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षपदी नगरसेवक विष्णु नागरीकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.नागरीकर हे ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी असून गोंदिया शहरात संघटनेचे जाळे बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोजंक प्राचार्य बबनराव तायवाडे व ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केली.नागरीकर यांच्या निवडीचे बैठकिला उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी व समाजबांधवानी अभिनंदन केले आहे.

राजकीय पक्ष ओबीसी पदाधिकाèयांचे समन्वयकपदी माजी खा.डॉ.खुशाल बोपचे

0

berartimes.com गोंदिया,दि.25- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने २४ सप्टेंबरला मयुर लॉन येथे आयोजित बैठकित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ८ डिसेंबरच्या ओबीसी महामोच्र्याला यशस्वी करण्यासाठी विविध पक्षातील ओबीसी नेते,पदाधिकारी यांच्याशी समनव्य ठेवण्यासाठी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांची राजकीय पक्ष ओबीसी पदाधिकाèयांच्या समनव्य समितीचे प्रमुख म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायडावे व निमंत्रक सचिन राजूरकर यांनी नावाची घोषणा केली.त्यांच्या नावाची सुचना सामाजिक कार्यकर्ते जिवन लंजे यांनी केली होती.माजी मंत्री भरतभाऊ बहेकार,माजी.जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.झामसिंह बघेले,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,जीडीसी बँकेचे संचालक प्रमोद लांजेवार ,रेखलाल टेंभरे,गोपाल तिराले,दुर्गाताई तिराले,महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष धन्नालाल नागरिकर तसेच शेकापचे जिल्हा सयोजंक चनीराम मेश्राम यांनीही डॉ.बोपचे यांनी समन्वयकाची भूमिका स्विकारत ओबीसी महामोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,कैलाश भेलावे,राजेश नागरीकर,सविता बेदरकर,मोहिनी निंबार्ते,खेमेंद्र कटरे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तिरोडा मतदारसंघात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारा

0

berartimes.com तिरोडा,दि.25-हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक तिरोडा विधानसभा मतदारसंघात उभारण्यात यावे,या मागणीचे निवेदन  आमदार विजयभाऊ रहांगडाले यांना देण्यात आले.युवा सेनेचे कपिल भोंडेकर यांच्या नेतृत्वात आ.रहागंडालेना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली,त्यावेळी खुशाल राउत,अमित आगाशे,राहुल उके,हर्शल गजभिये,राहुल तरारे,भुवन पटले व इत्तर शिवभक्त उपस्थित होते.