बोदलकसा पर्यटक निवास आजपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू

0
33

berartimes.com
गोंदिया,दि.२६ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रतिवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिनङ्क म्हणून साजरा करण्यात येतो. ‘‘पर्यटन सर्वांसाठी, प्रचालन सार्वत्रिक प्रवेशाचाङ्कङ्क नुसार महामंडळाने जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा हे नविन पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी शोधलेले असून येथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बोदलकसा पर्यटक निवास जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या पर्यटक निवास बोदलकसाचे दोन मजल्याचे बांधकाम असून पर्यटक निवासात दोन बिछान्याचे ८ व्हीआयपी सूट, दोन बिछान्याचे ८ डिलक्स सूट, दोन बिछान्याचे ८ ए.सी.रुम, दहा बिछान्याचे १ लोकनिवास, आठ बिछान्याचे २ लोकनिवास, उपहारगृह आणि १०० लोकांकरीता कॉन्फरन्स हॉल आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.