गडचिरोली, दि.२७: नक्षल्यांच्या विरोधात लढण्यासाठी जिल्ह्यात सीआरपीएफच्या ५ बटालियन तैनात असून, नक्षली कारवाया रोखण्यात सीआरपीएफला यश आल्याचा दावा केंद्रीय राखीव दलाच्या पश्चिम विभागाचे पोलिस महानिरीक्षक राजकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.सीआरपीएफच्या १९२ बटालियनच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजकुमार यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात सिव्हीक अॅक्शन उपक्रमाद्वारे दुर्गम भागातील जनतेशी सातत्याने संपर्क व संवाद साधण्याचे काम सीआरपीएफद्वारे होत आहे. परिणामी गोरगरीब नागरिक मुख्य प्रवाहात येऊ लागला आहे. येथील सीआरपीएफचे जवान स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नक्षलवादाच्या उच्चाटनासाठी कार्यरत असून, अन्य राज्यांच्या तुलनेत गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया रोखण्यात आम्हाला यश आले, असेही ते म्हणाले.
राज्य पोलिसांद्वारे आत्मसमर्पण योजनेद्वारे नक्षल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरु आहे. नक्षल्यांनी या योजनेचा लाभ घेऊन विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन राजकुमार यांनी केले. सीआरपीएफ सिव्हीक अॅक्शन उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात शौचालय निर्मिती, सोलर लाईट व अन्य जीवनोपयोगी साहित्य वाटप करीत आहे. यामुळे गरीब नागरिकांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावत आहे, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे पोलिस महानिरीक्षक दिनेश उनिवाल व कमांडंट मनोजकुमार उपस्थित होते.
नक्षल्यांच्या हिंसक कारवाया रोखण्यात सीआरपीएफला यश: पोलिस महानिरीक्षक राजकुमार
ओबीसी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे-प्रा.पिसे
नागपूर,दि.27-राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उद्या २८ ऑगस्टला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत ,शिवाजी सायन्स कॉलेज सभागृह, कॉंग्रेसनगर, नागपूर येथील सभागृहात ओबीसी समाजाचे सवैंधानिक अधिकार ,नॉनक्रिमिलेअर ,फ्रिशीप भारत सरकार स्कॉलरशिप आणि रोजगार स्वंयमरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओबीसी विद्यार्थीसांठी करण्यात आले.या कार्यशाळेत ओबीसी समाजातील विद्यार्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा.रमेश पिसे,डाॅ.राजू गोसावी,निकेश पिने आदींनी आवाहन केले.
तसेच त्यांच्या पालकांना व बेरोजगारांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे राहणार आहेत. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे उपजिल्हाधिकारी निशीकांत सुके, कमला नेहरु महाविद्यालय नागपूरचे प्रा. रमेश पिसे, ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती दिली.ओबीसी विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन युवा समितीचे प्रमुख मनोज चव्हाण , विद्यार्थी संघटना प्रमुख निकेश पिणे,प्रा.गजानन धांडे, निलेश खोडे, उज्वला महल्ले, हजारे यांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी ९४२३३९०९०९ मनोज चव्हाण, ९१९८६०७१५१२१ निकेश पिणे, ९१९५६१३४५३९८ उज्वला महल्ले, ९१८८०५९५१८७९ निलेश खोडे ,९१७७७६८२१३२७ विनोद हजारे यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन केले आहे.
कमी रोवणीच्या गावांची आमदारांकडून पाहणी
तिरोडा,(berartimes.com)दि.27 -तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा तालुक्यातील ८0 टक्क्यापेक्षा कमी रोवणी झालेल्या गावांना शुक्रवारला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तालुक्यातील नवेगाव (खु.), मनोरा, मुरपार, केसलवाडा, सेलोटपार, खैरी, खेडेपार, सितेपार, कुलपा, नवेझरी, निलागोंदी व मुरमाडी या गावांमध्ये प्रत्यक्ष जनतेशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, र्शावण बाळ योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मगारोहयो या विविध राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली व लाभ घेण्यासंबंधी प्रोत्साहित केले. रोवणी न झालेल्या गावांच्या दौर्यावर आमदार विजय रहांगडाले यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, पं.स.कृषी विस्तार अधिकारी भायदे, पं.स.सदस्य पवन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, कृषीमित्र प्रमोद गौतम तसेच संबंधित गावातिल कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रा.पं.सचिव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते
“जिल्हा स्वयंरोजगार संघाच्या अध्यक्ष पदी टेंभरे व सचिव पदी वैद्य यांची निवड”
गोंदिया ,दि.27:-गोंदिया जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था चा संघ मर्यादित गोंदिया च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची अध्यासी सभा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस. एस. बोरकर यांचे अध्यक्षते खाली दि. २६ ला दुपारी १:०० वाजता शासकीय विश्रामगृह, गोंदिया इथे घेण्यात आली. संघाच्या अध्यक्ष पदाकरीता रमेश लक्ष्मण टेंभरे आणि सचिव पदाकरीता धनंजय सुर्तीसेन वॆद्य यांचे एक एक नामांकन अर्ज आल्याने त्यांना अविरोध अध्यक्ष व सचिव निवडून आल्याचे श्रीमती एस. एस. बोरकर यांनी घोषित केले. संचालक मंडळाच्या पदाधिकारी निवड सभेत सर्वानुमते उपाध्यक्ष पदावर संजय रतिराम दरवडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेत नवनिर्वाचित संचालक संतोष बिसेन, सतिष कोसरकर, रवि काकडे, श्रीमती अनिता तुरकर, रत्ना बावनथडे, सिकंदर खान जमिल अहमद, भारत शुक्ला, रोहन यादव व पदाधिकाऱ्यांचे स्वागत संघाचे निर्वतमान संचालक मुन्ना राहांगडाले, महेश ठवरे व उपस्थित सभासदाकडुन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राहुल यादव, दारा बॆरीसाल, नंदकीशोर पानतावणे, मिलींद बाबोंळे, दिपम पांडे, धनपाल चॊधरी, उध्दव साकुरे, गणेश तुरकर, प्रवीण चचाने, विशाल शुक्ला, अंजली जांभुळकर व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन व आभार धनंजय वॆद्य यानी केले.
रेतीची तस्करी करणारे ट्रक जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले
सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या भेटीवर अचानक गेलेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी टीपीपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक पकडल्याची कारवाई शुक्रवारी सिरोंचा येथे केली. सदर पाचही ट्रक सुरुवातीला सिरोंचाच्या तहसील कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
रेती तस्करी प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या ट्रकांमध्ये टीएस-१५-यूबी-१८१८, टीएस-१५-यूबी-१८९९, टीएस-०५-यूबी-५८५९, एपी-२९-डब्ल्यू-२५२९ व टीएस-१५-यूबी-३९६९ या क्रमांकाच्या ट्रकांचा समावेश आहे.
माजी खा.शिशुपाल पटलेंसह पाच जणांना शिक्षा
वर्धा,दि.27: भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी भंडारा-गोंदियाचे माजी खासदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिशुपाल पटले व त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना एक वर्षाचा सश्रम करावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एका महिना साध्या कारावासाचे प्रावधान आहे. हा निकाल येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने-गाडेकर यांनी खुल्या न्यायालयात शुक्रवारी दिला.
भेसळयुक्त दूधाची विक्री केल्याप्रकरणी वर्धेतील मे. राजेंद्र दुधडेअरीचे राजेंद्र भुराजी अवथळे याला आरोपी करण्यात आले होते. तसेच सदर दूधाचे उत्पादक मे. पवन मिल्क अँन्ड फूड प्रोडक्टस, एस.आय.डी.सी. तुमसर रोड, ता. तुमसर, जि. भंडारा हे असल्यामुळे सदर पेढीचे सर्व मालक व भागीदार शिशुपाल नत्थूजी पटले, दूर्गाप्रसाद शंकरलाल पटले, सुमन दुर्गादास पटले, शिल्पा शिशुपाल पटले यांना भेसळयुक्त दुधाची उत्पादन व विक्रीप्रकरणी आरोपी करण्यात आले होते.याप्रकरणी साक्षीपुरावे नोंदविण्यात आले होते. आरोपी व शासनाच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. तत्कालीन अन्न निरीक्षक सं.भा. नारागुडे यांनी वर्धेतील मे. राजेंद्र दूध डेअरी या पेढीस अचानक भेट दिली. दरम्यान राजेंद्र भुराजी अवथळे याच्याकडून मे. पवन मिल्क अँन्ड फूड प्रोडक्टस, तुमसर रोड, भंडारा द्वारा उत्पादित ‘केशर गाय का दूध’ या अन्नपदार्थाचा नमुना 0२ ऑक्टोबर २00८ रोजी भेसळीच्या संशयावरून विश्लेषणाकरिता घेण्यात आला होता. सदर नमुना विश्लेषणाअंती कायद्याने ठरवून दिलेल्या गाईच्या दूधाच्या मानकापेक्षा कमी मानकाचे घोषित झाले. या आधारे प्रकरणाचा संपूर्ण तपास तत्कालीन अन्न निरीक्षकाने करून प्रकरण जानेवारी २00९ मध्ये येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट केले होते.
राज्यात आणीबाणी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न-वडेट्टीवार
नागपूर : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कायद्याद्वारे सामान्य माणसाचा जगण्याचा हक्क हिरावण्याचा बेत आहे. लोकशाही असलेल्या देशात सरकार विरोधकांचाच नव्हे, तर सामान्य माणसांचाही आवाज दाबण्याच्या प्रयत्नात आणीबाणी लागू करीत आहे, असा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केला.
कायद्यातील अटी सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. यातील तरतुदींनुसार मोर्चा काढण्यासाठी, एखाद्या समारंभासाठी १००पेक्षा जास्त लोक एकत्र येत असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. पोलिसांना कायदेभंगाचा संशय आला तर थेट तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार मिळतील व यातून भ्रष्टाचार फोफावेल, असा धोका वडेट्टीवार यांनी वर्तविला.
‘जय’ वाघाचा तपास होणार सीआयडीमार्फत – मुख्यमंत्री
गोंदिया, दि. २७ – पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून आता त्याच्या तपासासाठी सीआयडीला पाचारण करण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘जय’च्या हत्येच्या संशयावरून वनविभागाच्या अधिका-यांनीभंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील दोघांना ताब्यात घेतले होते.
आशियातील सर्वात मोठा वाघ अशा ‘जय’ची ओळख असून तो गेल्या काही वर्षांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची खास ओळख बनला होता. जंगलात ‘जय’चे दर्शन होताच पर्यटकही समाधान व्यक्त करीत होते. तो अल्पावधीतच राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या या अभयारण्यात रांगा लागत होत्या.
दुसरीकडे मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांनी स्वत: सुत्रे हातात घेत वनाधिकाऱ्यांसह जंगल पिंजुन काढला. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्य वनसंरक्षक उमेश वर्मा व अड्याळचे वनक्षेत्राधिकारी पी. जी. महेश पाठक, पवनीचे आर. एफ.ओ. दादा राऊत, भंडाराचे आर. एफ. ओ. मेश्राम, येटवाईचे पोलीस पाटील राजेश वरखेडे यांचा सहभाग होता.काटेखाये यांनी सांगितेल्या स्थानावर पुन्हा नव्याने शोध मोहिम सुरु केली. त्यात त्यांना वाघाची विष्ठा, त्याच्या शरिरावरील केस आढळले. परिसर मोठा असल्यने याठिकाणी १०० ट्रॅप कॅमेरे लावण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षकांनी वनाधिकाऱ्यांना दिले.
स्नेहा करपे मोहाडी नगरपंचायत मुख्याधिकारीपदी
मोहाडी दि.27: मोहाडी नगरपंचायत झाल्यापासुन प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन तहसिलदार किंवा भंडारा नगरपरिषदचे मुख्याधिकारी कार्यभार पाहत होते. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशनानुसार मोहाडी नगरपंचायत मध्ये ठाणे येथील स्नेहा अशोक करपे यांची प्रथमच नियुक्ती झाली असुन त्यांनी मुख्याधिकारी म्हणुन रूजु झाले आणि कार्यभार सांभाळले आहे.
२0 टक्के रोवण्या अजूनही अपूर्णच
तिरोडा दि.27:तालुक्यातहव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने आजही अनेक शेतकर्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेली खरिपाची शेती पाण्याविहीन कोरडी पडली आहे. माजी आमदार दिलीप बंसोड यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शुक्रवार (दि.२६) पिकांची पाहणी केली. त्यात २0 टक्के रोवण्या आजही अपूर्णच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वडेगाव क्षेत्रात पावसाच्या कमी प्रमाणामुळे अनेक गावांत २0 टक्के रोवण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्यांनी डोक्यावर हात ठेवून आकाशाकडे नजरा वळविल्या आहेत. खोळंबलेल्या रोवण्यांची कृषी विभागाकडून चौकशी करण्यात यावी व त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी