31.2 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 6

राष्ट्रीय लोकअदालतीत ९७ लाखांहून अधिक रकमेची वसुली; १०० प्रलंबित आणि २२ दाखलपूर्व खटले निकाली

0
गडचिरोली दि.११ – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या आदेशानुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा व तालुका न्यायालयांत १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण १० पॅनलच्या माध्यमातून प्रलंबित व दाखलपूर्व अशा एकूण १२२ प्रकरणांमध्ये तडजोड साधण्यात आली. या लोकअदालतीत एकूण ९७ लाख ५२ हजार ४९१ रुपये रकमेची वसुली करण्यात आली.
फौजदारी तडजोड प्रकरणे, धनादेश कायद्याखालील कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार अपघात दावा, कर्जवसुली, वीजबिल थकबाकी, ग्रामपंचायतींची घरपट्टी-पाणीपट्टी, ग्राहक न्यायालयातील तक्रारी आणि वाहन चालान अशा विविध स्वरूपातील प्रकरणांचा यात समावेश होता. किरकोळ गुन्ह्यांपैकी ५४ प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्यात आली.
पॅनल क्रमांक २ मध्ये एक वैवाहिक प्रकरण आपसी समझोत्याने निकाली निघाले. पती-पत्नी एकत्र नांदायला तयार झाल्याने त्यांचा साडी-चोळी व शेला देऊन सत्कार करण्यात आला.
या लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी व सचिव न्या.आर. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. पॅनल क्रमांक १ चे कामकाज पी. आर. सित्रे यांनी, पॅनल क्रमांक २ चे एस. पी. सदाफळे यांनी आणि पॅनल क्रमांक ३ चे एस. बी. विजयकर यांनी पाहिले. किरकोळ गुन्ह्यांची सुनावणी व्ही. आर. मालोदे यांच्या न्यायालयात पार पडली.
पॅनल सदस्य म्हणून मनोहर हेपट, देवाजी बावने आणि अर्चना चुधरी यांनी सहभाग घेतला. गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष किशोर आखाडे, ज्येष्ठ अधिवक्ते, संपूर्ण अधिवक्ता वर्ग, न्यायालयीन कर्मचारी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी यांनी या लोकअदालतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले.

मोहाडी ते चोपा रस्ता अर्धवट सोडून ठेकेदार पसार

0

गोरेगाव-. तालुक्यातील मोहाडी ते चोपा या तीन किमी रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. रस्त्याचे अर्धवट काम करून सदर कंत्राटदाराने कामाकडे मागील दीड महिन्यांपासून पाठ फिरवून पसार झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी किती दिवस रस्त्याअभावी हाल सहन करावेत, हा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.
मोहाडी ते चोपा नव्हे तर, गोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह होत चालली आहे. परंतु, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी
मूग गिळून गप्प आहेत. परिणामी, परिसरातील मोहाडीपासून चोपापर्यंत गाव-खेड्यातील नागरिक, वाहनधारक, विद्यार्थी वर्गाला अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याचा, रस्त्यावरील खड्डे, तसेच चढ उताराच्या रस्त्याचा नाहक त्रास सहन
करावा लागत आहे. परिसरातील मोहाडी ते चोपासह, मोहाडी, आकोटोला, कनारटोला, चोपा अर्धवट बांधकाम झालेल्या रस्त्यावरील पडलेल्या भेदक खड्यांमुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून अर्धवट रस्त्याचे बांधकाम व गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे हे जशास तसे आहेत.
याकडे ना ठेकेदारांचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुठल्या अधिकाऱ्याचे. याबाबत मागील एक महिन्यापासून मोहाडी ग्रामपंचायत सरपंचासह अनेक नागरिकांनी संबंधित
विभागाला वारंवार तक्रारी केल्या. थेट तालुक्याला जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यात गिट्टी, खड्डे, मुरुम, रस्त्याचा चढ-उतार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वाहनांचे वेळेपूर्वीच देखभाल दुरुस्तीचे काम करावे लागते. पर्यायी शारिरीक आरोग्यासोबतच अर्थिक तसेच मानसिकही नुकसान सहन करावे लागत आहे. अर्धवट रस्त्याचे त्वरीत काम पूर्ण करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्यासह ग्रामीण भागातील

65 लाखांचा मुद्देमाल चोरणारा अखेर अटकेत

0

गोंदिया- गोंदियातील एका मोठ्या व्यावसायिकाकडे असलेले 65 लाख रुपयांचे दागिने आणि इतर मुद्देमाल शिवनाथ एक्सप्रेसमधून महिनाभरापूर्वी चोरीला गेला होता. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी छडा लावत ओरिसा राज्यातून चोरट्यांना ताब्यात घेतले. संतोष साहू ऊर्फ आफ्रिदी (34, रा. राधिका गली राऊरकेला), अब्दुल मन्नान (55, रा. राऊरकेला) अशी चोरट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिनेश पटेल यांच्या पत्नी हिना पटेल (54, रा. गोंदिया) या 4 एप्रिल 2025 रोजी पतीसोबत गोंदियाहून रायपूरला शिवनाथ एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या. राजनांदगाव आणि दुर्ग रेल्वे स्थानका दरम्यानच्या प्रवासादरम्यान, महिलेचा पर्स चोरीला गेला होता. त्यात दोन हिऱ्यांचे हार, चार हिऱ्याच्या अंगठ्या, एक कानातले दागिने आणि 45 हजार रोख रक्कम होती. तसेच एक मोबाईल देखील चोरीला गेला होता. या प्रकरणाची तक्रार रेल्वे पोलिसांत करण्यात आली होती. रेल्वेच्या पोलिस अधीक्षक श्वेता श्रीवास्तव सिन्हा यांनी रेल्वेचे पोलिस उपअधीक्षक एस.एन. अख्तर आणि सायबर सेलचे प्रभारी, जीआरपी भिलाई पोलिस स्टेशनचे प्रभारी यांना आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या होत्या.

खासदार प्रफुल पटेल उद्या गोंदियाच्या दौऱ्यावर

0

गोंदिया,दि.१०ः राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल दिनांक ११ में २०२५ ला गोंदियाच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी ११.०० वाजता, बगीचा रामनगर, निवास स्थान गोंदिया येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता सोबत भेट व चर्चा, दुपारी १२.३० वाजता श्री बाळकृष्ण पटले यांचे निवास स्थान कुडवा येथे सांत्वना भेट, दुपारी १.०० वाजता जिंजर हॉटेल येथे सर्जन असोसिएशन कार्यक्रम मध्ये उपस्थिती, सायंकाळी ६.०० वाजता कॅनेरा बँक जवळ श्री महेश गोयल यांचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने केले आहे.

खासदार डाॅ.पडोळेनी युध्द परिस्थिती बघत राष्ट्रसेवेकरीता दिले एक महिन्याचे वेतन

0

गोंदिया,दि.१०ःसध्या भारत व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युध्द परिस्थितीला बघून आपण व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्राशी संबधित असल्याने या काळात देशाच्या सिमेवर सैनदलाच्या आरोग्य शिबिरात सेवा देण्याची आपली ईच्छा असून या काळातील स्थिती बघता आपण आपले एक महिन्याचे खासदारकीचे वेतन राष्ट्रसेवेकरीता देत असल्याचे पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार डाॅ.प्रशांत यादवराव पडोळे यांनी आज(दि.१०)दिले आहे.सोबतच देशातील सर्व खासदार,लोकप्रतिनिधी यांना सुध्दा भारत पाकिस्तान युध्द वातावरणाच्या स्थितीत आपले एक महिन्याचे वेतन राष्ट्रसेवेकरीता सैनबलाचे मनोबल वाढविण्याकरीता द्यावे असे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी म्हटले आहे.

बिरसी विमानतळ पुनर्वसनासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करा : आमदार विनोद अग्रवाल

0

गोंदिया,दि.१०ः पुनर्वसन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या समस्या व त्यांच्या उपाययोजना यांना प्राधान्य देत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे बैठक घेत मुंबई मंत्रालयात सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना पूर्वी प्रस्तावित पाच लाख रुपयांच्या ऐवजी आता दहा लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत परसवाडा–कामठा रस्ता त्याचप्रमाणे, भविष्यात प्रकल्पामुळे बाधित होऊ शकणाऱ्या रावणवाडी–कामठा रस्त्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याबाबतही चर्चा झाली.
या प्रकल्पामुळे भविष्यात पुनर्वसित होणाऱ्या कुटुंबांसाठी पूर्वीच जागा निश्चित करणे व त्यांना वेळेवर आणि योग्य भरपाई देण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले.पुनर्वसित क्षेत्रांमध्ये पक्के रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, समाजमंदिर, शाळा इत्यादी मूलभूत सुविधा तातडीने निर्माण करण्याचे  निर्देश आमदार अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बिरसी व कामठा या भागातील असे सर्व मार्ग जे विमानतळाला थेट गावांशी जोडू शकतात, त्यांची ओळख करून त्यांचा विकास करण्याला प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली. यामुळे ना केवळ प्रवास सोपा होईल, तर आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल. सर्व प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत आमदार विनोद अग्रवाल, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, बिरसी विमानतळाचे संचालक गिरीश वर्मा, तहसीलदार शमशेर पठाण, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, पंचायत समिती सभापती मुनेश राहंगडाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लभाने, बिरसीचे सरपंच उमेश पंडेले, शाखा अभियंता कट्यारमल, खातियाचे सरपंच ललित तावडे व तलाठी उपस्थित होते.

सोनाली रायपुरे-सहारे यांच्या ‘सोनप्रहर’ ललित संग्रहाचे थाटात प्रकाशन

0

ब्रम्हपूरी,दि.१० मे: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने दि. ७ मे २०२५ रोजी ‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह’ छत्रपती संभाजीनगर येथे ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन समारंभ व काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या भव्य प्रकाशन समारंभात विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या सोनाली सहारे यांच्या ‘सोनप्रहर’ या ललित संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. सोबतच मुख्य संपादक राहुल पाटील यांनी काढलेल्या ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
सोनाली सहारे यांचा काव्यवाचन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक आला त्यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे मराठी शिलेदार समूहातर्फे काढण्यात आलेले पाचवे पुस्तक आहे. यापूर्वी भावस्पर्श, काव्यसृष्टी, मनतरंग ,सूर्य विचार सोनशिल्प सूविचार संग्रह प्रकाशित झाले आहेत.तसेच आता सोनप्रहर हा ललित संग्रह प्रकाशित झाला.
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरुचक आमदार मा.विक्रम काळे, उद्घाटक व मुख्य आयोजक मा.डाॅ.पद्मा जाधव, शिवव्याख्याते डॉ.बालाजी जाधव, यशवंतराव चव्हाण सेंटरचे सचिव मा.नरेश शेळके, बुलढाणा, आयोजक ए बी पठाण, प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवयित्री स्वाती मराडे आटोळे पुणे, मराठीचे शिलेदार संस्थेचे विश्वस्त प्रमुख अशोक लांडगे, व अरविंद उरकुडे यांच्या हस्ते एकूण २१ कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, विशेषांकाच्या प्रती व पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुटुंबातील सिध्दार्थ भाऊरावजी सहारे उपस्थित होते. आई बाबा सौ.अर्चना मारोतराव रायपुरे, गडचिरोली, मुले साची, सम्राट बहिण  मोनाली परमेश्वर दुर्गे, भाऊ लीना राहुल रायपुरे , जिया, अभीधम्म , शर्लिन यांनी शुभेच्छा दिल्या.
या समारंभाचे बहारदार सूत्र संचालन मुख्य परीक्षक व कोषाध्यक्ष सविता पाटील ठाकरे सिलवासा, आयोजक प्रशांत ठाकरे, सिलवासा व कवी विष्णू संकपाळ यांनी केले तर आभार आयोजक कवयित्री वर्षा मोटे यांनी मानले. याप्रसंगी राज्यातील व राज्याबाहेरील मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिरखेडी येथील मालतीबाई कटरे यांचे निधन

0

सालेकसा,दि.१०ः तालुक्यातील तिरखेडीचे माजी सरपंच योगेश कटरे यांच्या मातोश्री मालतीबाई भरतसिंह कटरे यांचे आज १० मे रोजी दिर्घ आजाराने दुपारी १२.३० वाजता निधन झाले.त्यांच्यावर उद्या दिनांक:- 11/05/2025 रोज रविवारला दुपारी 12.00 वाजता तिरखेडी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गणित व विज्ञान विषयाचे शिक्षकच नसतांना जि.प.प्राथ.शाळेत आठवीचे वर्ग सुरु करण्याचा अट्टाहास का?

0

गोंदिया,दि.१०-राष्ट्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावातच असायला हवी.या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र ते वर्ग सुरु करतांना शासन शिक्षक देणार नाही,हे तेवढेच स्पष्ट आहे.सध्याच्या घडीला सेमी इंग्रजी व इंग्रजीमाध्यामाच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांच्या कल असतांना जिल्हा परिषदेच्या शांळामध्ये पाहिजे तसे गणित व विज्ञान विषयाचे शिक्षकच नसतांना जि.प.प्राथ.शाळेत आठवीचे वर्ग सुरु करण्याचा अट्टाहास का?असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेने २०१५-१६पासून जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शांळामध्ये आठवीचे वर्ग सुरु केले आहे,मात्र त्याठिकाणी विज्ञान व गणिताचे शिक्षकच नाहीत.सोबतच विद्यार्थी सेमी इंग्रजीकडे जाऊ इच्छित असला तरी स्थानिक राजकारण व शाळेत इयत्ता आठवीतील अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून शिक्षक नसतानाही अनेक शाळा समिती मुख्याध्यापक व शिक्षकासोबत वर्ग सुरु करण्याच्या अट्टाहास करु लागल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जाणवू लागले आहे.इयत्ता आठवी वर्ग सुरु करणार्या शाळामध्ये बीएस्सी बीएड असलेले गणित व विज्ञान विषयाचे किती शिक्षक त्या शाळेत उपलब्ध आहेत अशी विचारणा केल्यावर मात्र शिक्षण विभाग हात वर करते.उलट शिक्षक आम्ही देणार नाही,या अटीवरच वर्ग सुरु करण्याची परवानगी देत असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे,अशा वेळी जोपर्यंत विज्ञान व गणिताचे शिक्षक आठवी वर्ग सुरु करणार्या शाळेत आहेत की नाही,याची खात्री केल्याशिवाय शाळाव्यवस्थापनांनी सुध्दा मुलांच्या भविष्य़ाशी खेळणे कितपत योग्य अशा चर्चांना आता वेग आलेला आहे.

या नव्या निर्णयानुसार आता ज्या गावापासून पाचवी वर्ग असलेली शाळा एक किमीपेक्षा लांब असेल आणि आठवी वर्गाची शाळा तीन किमीपेक्षा दूर असेल, अशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना हे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्याचा शासनाचा निर्णय आहे.मात्र जर गावात व गावाशेजारीच शाळा असेल तर असे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही असे सुद्धा शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.दरम्यान, हे वर्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या शाळेच्या सुविधांची पडताळणी होणे आवश्यक असते,पण ती पडताळणी न होताच स्थानिक राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईतच अनेक शांळाना वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली गेल्याने आज गोंदिया जिल्ह्यातील काही अपवादात्मक शाळा वगळता जिल्हा परिषदेच्या ज्या प्राथमिक शाळामध्ये आठवीचे वर्ग सुरु करण्यात आलेत,तेेथील परिस्थिती बिकट दिसून येत आहे.

राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी पदभार स्विकारला

0
अमरावती, दि.10: अमरावती खंडपीठ राज्य माहिती आयुक्तपदी रविंद्र हनुमंतराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरूवार, दि 8 मे रोजी कार्यभार स्वीकारला.
यावेळी राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठातील उप सचिव देविसिंग डाबेराव, तत्कालीन उप सचिव अॅड. डॉ. सुरेश कोवळे आणि आयोगातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नवनियुक्त राज्य माहिती आयुक्तांनी सर्वप्रथम आयोगातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी ओळख करून घेतली. त्यानंतर उप सचिव श्री. डाबेराव यांच्याकडून त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. कार्यालयाची पाहणी करून आपल्या कामकाजाला सुरुवात केली.