33.2 C
Gondiā
Wednesday, May 14, 2025
Home Blog Page 5664

‘गोसेखुर्द’ चे २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

0

भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. धरणाचा जलस्तर २४१.५00 मीटरवर स्थिर ठेवण्यासाठी धरण विभागाने ३३ पैकी २९ दरवाजे अर्धा मीटरने सुरू केले आहे. या दरवाजामधून १ लाख ४,५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता बळावली आहे. वैनगंगा नदीच्या वरच्या भागात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात नदी-नाले आणि धरणाचा जलस्तर वाढला आहे. संभावित पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर जलाशयाचे दरवाजे सुरू केल्यामुळे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले आहे.
कालीसराड धरणाचे दोन दरवाजे १.६0 मीटर, पुजारीटोला धरणाचे १0 दरवाजे १.२0मीटर तर सिरपूर धरणाचे ६ दरवाजे 0.३0 मीटरने सुरू केले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढत आहे.
गोसेखुर्द धरणाचा वाढता जलस्तर लक्षात घेता ३३ दरवाजांपैकी २९ दरवाजे सोमवारच्या रात्री ११ वाजता अर्धा मीटरने सुरू करण्यात आले. या दरवाजांमधून १ लाख ४.५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारला सकाळी कारधा नदी पुलावर वैनगंगा नदीचा जलस्तर ४.९७ मीटर नोंदविण्यात आला असून ९ मीटर या धोक्याच्या पातळीपासून ४ मीटरने खाली आहे.

गोंडमोहाडी येथे शेतकरी मेळावा

0

तिरोडा : शुक्रवारी ९ सप्टेंबरला गोंडमोहाडी येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात धानपिकांवर लागणारे रोग, रोगांवरील औषधींचे नावे व किती प्रमाणात औषधी फवारणी करावी तसेच धानपिकांना कोणत्या प्रकारे रोग लागण्याची शक्यता असते व उपाययोजना यावर शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी शासनाच्या शेतीविषयक योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यास जनतेस प्रवृत्त केले. अध्यक्षस्थानी आ. विजय रहांगडाले होते. मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी पोटदुखे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चिंतामन रहांगडाले, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री चतुर्भुज बिसेन व समस्त गावकरी उपस्थित होते.

हरिणखेडेना कनिष्ठ लेखाधिकारी पदावर पदोन्नती

0

गोरेगाव,दि.१३-गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त विभागार्तंगत कार्यरत फनेंद्र हरिणखेडे यांची तिरोडा पंचायत समिती येथून गोरेगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे.हरिणखेडे यांनी ३१ ऑगस्ट रोजी गोरेगाव ंपंचायत समितीमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी पदाची जबाबदारी स्विकारली असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जलतरण केंद्रात चिमुकल्याचा मृतदेह

0
गोंदिया–  संजय नगर परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुकल्याचा जलतरण केंद्रात बुडून मृत्यू झाला आहे .मात्र मृत मुलाच्या वडिलाने मुलाची हत्या करून जलतरण केन्द्रात मृतदेह फेकल्याचा आरोप केला आहे. मागील दोन दिवसांपासून हा चिमुकला घरून बेपत्ता होता. तशी तक्रार मृत मुलाच्या पालकांनी गोंदिया शहर पोलिसात केली होती. मात्र आज सकाळी जवळच असलेल्या रामदेव बाबा काॅलोनीतील बंद जलतरण केंद्रात मृतदेह मिळाल्याने परिसरात खडबळ उडाली आहे.boy-death3
गोंदियाच्या संजय नगर परिसरात राहणारा हा ८ वर्षीय चिमुकला ११ सप्टेंबरला दुपारी आपल्या मित्रांसोबत घरून खेळायला निघाला होता. मात्र त्याने जवळच असलेल्या एका सायकल दुकानातून छोटी सायकल भाड्यावर घेऊन फिरण्याकरीता निघाला असल्याची माहिती त्याच्या मित्राच्या वडिलांनी दिली.
सुरवातीला पालकाने गणेश उत्सवाचे दिवस असल्याने मुलगा गणपती बघण्याकरिता मित्रांसोबत गेला असावा असे म्हणत लक्ष दिले नाही. मात्र संध्यकाळ होऊनही समयांक घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी याची तक्रार गोंदिया शहर पोलिसात केली.पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला मात्र दोन दिवस लोटूनही मुलाचा शोध लागत नसल्याने पालकाने परिसरात लोकांना समयंकचा फोटो दाखवून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आज सकाळी समयंकच्या घरापासून एक किलो मिटर अंतरावर असलेल्या रामदेव बाबा काॅलोनीत बंद पडला असलेल्या जलतरण केंद्रात गार्डला जलतरण केंद्राच्या बाहेर कपडे पडले असल्याचे दिसले असता जलतरण केंद्राची पाहणी केली असता समयांकचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.
तिथल्या गार्डने यांची माहिती रामदेव बाबा काॅलोनीच्या मालकाला दिली.  मालकाने याची माहिती पोलिसात दिली असता घटना स्थळाचा पंचनामा केला. हा मृतदेह समयंकचा असल्याचे उघडकीस आले तर काॅलोनीच्या आवारात समयंकने भाड्यावर घेतलेली सायकल आढळून आल्याने समयंक काॅलोनीतली जलतरण केंद्रात जिवंत पोहचला की त्याचा मृतदेह कोणी पाण्यात आणून फेकला असावा या दोन्ही दिशेने तपास सुरु आहेत. मात्र समयंकच्या शरीरावर छोट्या जखमा आढडून आल्याने त्याची हत्या करून पाण्यात फेकले असल्याचा समयंकच्या वडिलांचे म्हणणे आहे. मात्र या संदर्भात पोलिसांना विचारणा केली असता शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कळेल .

मराठा मोर्चे दलितविरोधी असल्‍याचा संघाकडून प्रचार होतोय- प्रकाश आंबेडकर

0
नवी दिल्ली- मराठा मोर्चे हे दलितांविरोधी असल्‍याचा प्रचार राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाकडून सुरू आहे, असे म्‍हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संघावर नेम साधला आहे. एका वृत्‍तवाहिनीशी बोलताना ते म्‍हणाले की, ‘मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हिताचे नव्हे.’
कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर राज्‍यात विविध जिल्‍ह्यांमध्‍ये मराठा समाजाचे मोठ्या संख्‍येने मूक मोर्चे निघाले; अजूनही विविध जिल्‍ह्यांमध्‍ये मोर्चे निघणार आहेत. त्‍या पार्श्‍वभूमिवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, मराठा मोर्चा हा त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करत आहे, याचे मी स्वागत करतो. हा मोर्चा दलितविरोधी असल्‍याचा चुकीचा प्रचार संघाकडून केला जात आहे. मुळात कोपर्डी प्रकरणातील आरोनींना आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनीच पकडून दिले आहे. पण संघाने या प्रकरणाचे राजकारण सुरु केले आहे. मात्र, काही लोक प्रतिमोर्चा काढण्याचे ठरवत असतील तर, असे मोर्चे निघू नयेत असे आपल्‍याला वाटते असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. जे लोक मोर्चे काढतील, ते संघ आणि भाजपच्या हातातील बाहुले झालेले असतील, असेही ते म्‍हणाले.

सडक अर्जुनी व तिरोडा मनसे तालुकाध्यक्षांची निवड

0

berartimes.comगोंदिया,दि.१३- गोंदिया जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्षांच्या नियुक्ता करीत शुभेच्छा दिल्या.यामध्ये राजूभाऊ यावलकर यांची सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष पदी तर बबन बडोले उपाध्यक्षपदी निवड झाली.तर अमोल लांजेवार यांचीही उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे तिरोडा तालुका अध्यक्षपदी खुशाल राऊत यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी नवनियुक्त पदाधिकाèयाना शुभेच्छा दिल्या तसेच पक्षवाढीसंबंधी मार्गदर्शन केले. जिल्हा उपाध्यक्ष मिलन रामटेककर, मुकेश मिश्रा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उदय पोफळी, शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे, उदय काळे, राजेश नागोसे, दिलीपजी कोसरकर, प्रवीण उके, गणेश शहारे, रणजीत काणेकर, संदीप भेंडारकर, भूषण पटले, कपिल टेंभरे, राजेश गोटेफोडे, निलेश मेश्राम, नितेश कटरे, कुणाल टेंभरे, राधे हिरापुरे, प्रमोद काशमे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमधील 10 जिल्ह्यात कर्फ्यू

0

श्रीनगर- 90 च्या दशकानंतर पहिल्यादा बकरी ईदच्या दिवशी काश्मीर खोर्‍यातील 10 जिल्ह्यांंमध्ये संंचारबंंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. काश्मीरमधील महत्वाच्या मशिदी बंद असण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात दोन युवकांंचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूूमीवर काश्मीर खोर्‍यातील वातावरण जास्त चिघळणार नाही, याची प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा, बंदीपुरा, शोपियन आणि कुलगामसह 10 जिल्ह्यात संंचारबंंदी लागू करण्यात आली आहे. या काळात इंटरनेट सर्व्हिसेस बंद करण्यात आली आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येेणार आहे.दरम्यान, बुरहान वानीच्या मृत्यूनंतर सुरू झालेला जम्मू काश्मीरमधील हिंसाचार अजूनही कायम आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हिंंसाचाराला ‘कश्मीरी नागरिकांंची कुर्बानी’ असेे संंबोधले आहे.

राज्याने अ‍ॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याच्या केंद्राला शिफारशी कराव्यात – विनायक मेटे

0
पुणे, दि. १४ – राज्य शासनाने अ‍ॅट्रासिटी कायद्याचा अभ्यास करून त्यामधील जाचक तरतुदींमध्ये सुधारणा करण्याच्या शिफारशी केंद्र शासनाला कराव्यात अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. मराठा व दलित समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन मेटे यांनी यावेळी केले.
शिवसंग्राम संघटना सरकारमध्ये सामील नाही मात्र महायुतीचे घटक असल्याचे मेटे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या प्रश्नावर भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम या महायुतीच्या समन्वय समितीची बैठक बोलाविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले.
मेटे म्हणाले, ‘‘अ‍ॅट्रासिटी कायद्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करता न येण्याची जाचक तरतुद आहे. त्याचबरोबर इतर चुकीच्या बाबींचा अभ्यास राज्य शासनाने करून त्या रदद् करण्याची केंद्र शासनाला शिफारस करावी. अ‍ॅट्रासिटी कायद्यातील ९५ टक्के केसमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे त्या व्यक्तिला मोठया त्रासाला सामोरे जावे लागते. शिवसंग्राम देखील २०१० ते २०१६ या कालावधीत अ‍ॅट्रासिटी खाली नोंदविलेल्या गेल्या केसचा अभ्यास करून त्याबाबत शासनाला सुधारणा सुचवील.’’

मनसेचा विदर्भवाद्यांची पत्रकारपरिषद उधळण्याचा प्रयत्न

0
मुंबई, दि. १३ – मुंबई पत्रकार संघातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला.  विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या वतीने ही पत्रकार परिषद सुरु होती.
मनसे कार्यकर्त्यांनी कोअर कमिटी सदस्य अँड वामन चटप यांना धक्काबुक्की केली. मनसे नगरसेवक संदीप देशपांडे, अमेय खोपकर, नगरसेवक संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न केला. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अँड नंदा पराते, डॉ. रमेशकुमार गजबे, धनंजय धार्मिक यांनी पत्रकार परिषद पुन्हा सुरू केली.

१८ सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा

0

गोंदिया: राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या १८ सप्टेंबर रोजी धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरच्या सभागृहात दुपारी १ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर विधान भवनावर काढण्यात येणाèया मोच्र्याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. सोबतच ओबीसी महिला मेळावा, ओबीसी विद्यार्थी मेळावा, ओबीसी अधिकारी-कर्मचारी मेळावा आदी आयोजित करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनावरील मोच्र्या संदर्भात प्रत्येक जिल्हास्तरावर जाऊन ओबीसी संगठना व पदाधिकाèयांची चर्चा करण्याचे ही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, शरद वानखेडे,खे‘ेंद्र कटरे विनोद उलीपवार, भूषण दडवे, रमेश पिसे, सुषमा भड, मनोज चव्हाण, निकेश पिणे, गुणेश्वर आरीकर, गोपाल सेलोेकर आदींनी दिली आहे.