जलतरण केंद्रात चिमुकल्याचा मृतदेह

0
14
गोंदिया–  संजय नगर परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुकल्याचा जलतरण केंद्रात बुडून मृत्यू झाला आहे .मात्र मृत मुलाच्या वडिलाने मुलाची हत्या करून जलतरण केन्द्रात मृतदेह फेकल्याचा आरोप केला आहे. मागील दोन दिवसांपासून हा चिमुकला घरून बेपत्ता होता. तशी तक्रार मृत मुलाच्या पालकांनी गोंदिया शहर पोलिसात केली होती. मात्र आज सकाळी जवळच असलेल्या रामदेव बाबा काॅलोनीतील बंद जलतरण केंद्रात मृतदेह मिळाल्याने परिसरात खडबळ उडाली आहे.boy-death3
गोंदियाच्या संजय नगर परिसरात राहणारा हा ८ वर्षीय चिमुकला ११ सप्टेंबरला दुपारी आपल्या मित्रांसोबत घरून खेळायला निघाला होता. मात्र त्याने जवळच असलेल्या एका सायकल दुकानातून छोटी सायकल भाड्यावर घेऊन फिरण्याकरीता निघाला असल्याची माहिती त्याच्या मित्राच्या वडिलांनी दिली.
सुरवातीला पालकाने गणेश उत्सवाचे दिवस असल्याने मुलगा गणपती बघण्याकरिता मित्रांसोबत गेला असावा असे म्हणत लक्ष दिले नाही. मात्र संध्यकाळ होऊनही समयांक घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी याची तक्रार गोंदिया शहर पोलिसात केली.पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला मात्र दोन दिवस लोटूनही मुलाचा शोध लागत नसल्याने पालकाने परिसरात लोकांना समयंकचा फोटो दाखवून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आज सकाळी समयंकच्या घरापासून एक किलो मिटर अंतरावर असलेल्या रामदेव बाबा काॅलोनीत बंद पडला असलेल्या जलतरण केंद्रात गार्डला जलतरण केंद्राच्या बाहेर कपडे पडले असल्याचे दिसले असता जलतरण केंद्राची पाहणी केली असता समयांकचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.
तिथल्या गार्डने यांची माहिती रामदेव बाबा काॅलोनीच्या मालकाला दिली.  मालकाने याची माहिती पोलिसात दिली असता घटना स्थळाचा पंचनामा केला. हा मृतदेह समयंकचा असल्याचे उघडकीस आले तर काॅलोनीच्या आवारात समयंकने भाड्यावर घेतलेली सायकल आढळून आल्याने समयंक काॅलोनीतली जलतरण केंद्रात जिवंत पोहचला की त्याचा मृतदेह कोणी पाण्यात आणून फेकला असावा या दोन्ही दिशेने तपास सुरु आहेत. मात्र समयंकच्या शरीरावर छोट्या जखमा आढडून आल्याने त्याची हत्या करून पाण्यात फेकले असल्याचा समयंकच्या वडिलांचे म्हणणे आहे. मात्र या संदर्भात पोलिसांना विचारणा केली असता शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कळेल .