बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमधील 10 जिल्ह्यात कर्फ्यू

0
11

श्रीनगर- 90 च्या दशकानंतर पहिल्यादा बकरी ईदच्या दिवशी काश्मीर खोर्‍यातील 10 जिल्ह्यांंमध्ये संंचारबंंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. काश्मीरमधील महत्वाच्या मशिदी बंद असण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात दोन युवकांंचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूूमीवर काश्मीर खोर्‍यातील वातावरण जास्त चिघळणार नाही, याची प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा, बंदीपुरा, शोपियन आणि कुलगामसह 10 जिल्ह्यात संंचारबंंदी लागू करण्यात आली आहे. या काळात इंटरनेट सर्व्हिसेस बंद करण्यात आली आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येेणार आहे.दरम्यान, बुरहान वानीच्या मृत्यूनंतर सुरू झालेला जम्मू काश्मीरमधील हिंसाचार अजूनही कायम आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हिंंसाचाराला ‘कश्मीरी नागरिकांंची कुर्बानी’ असेे संंबोधले आहे.