34.7 C
Gondiā
Sunday, May 18, 2025
Home Blog Page 5687

सीआरपीएफ जवान जखमी

0

छत्तीसगड – सुकूमा जिल्ह्यातील चिंतागुफा येथे आईडी स्फोट, एक सीआरपीएफ जवान जखमी.

पुरुषोत्तम हत्तीमारे यांचे निधन

0

गोंदिया,दि. २६ : गुदमा येथील रहिवासी पुरुषोत्त‘ रा‘चंद्र हत्ती‘ारे यांचे शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. २७) गुदमा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नीतेश राणेंविरोधात सरसावले विदर्भवादी

0

नागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्यासोबत विदर्भवाद्यांना मारण्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात विदर्भवादी सरसावले आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. मारण्याची धमकी देणाऱ्या राणे यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुरुवारी नीतेश राणे यांचा हिंगणघाट येथे पुतळा जाळून निषेध करण्यात आला.विदर्भ राज्य आघाडी चे संस्थापक अध्यक्ष मा.श्रीहरी अणे व विदर्भातील प्रत्यक विदर्भावाद्यांविरोधात जी धमकी वजा गरळ ओकली त्या विरोधात साकोली विदर्भ राज्य आघाडी चे साकोली तालुका प्रमुख राकेश भास्कर यांचे नेतृत्वात साकोली पोलीस स्टेशन ला तक्रार दिली.ह्यावेळी प्रवीण भांडारकर, सुनील जांभूळकर, दीपक जांभुळकर, शब्बीर पठाण, बाळू गिर्हेपुंजे, प्रवीण भांडारकर सानगडी आदी उपस्थित होते

नीतेश राणे बुधवारी नागपुरात आले असताना त्यांनी विदर्भवाद्यांवर जोरदार टीका करीत वेळ पडली तर मार देण्याची भाषा वापरली होती. यासंदर्भात सुरुवातीला विदर्भवाद्यांनी राणे यांच्याकडे दुर्लक्षच करण्याची भूमिका घेतली होती. परंतु गुरुवारी मात्र विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवाद्यांनी राणेंविरोधात पोलीस तक्रार केली. नीतेश राणे यांनी भडकावू वक्तव्य केले असून विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी विदर्भवाद्यांची मागणी आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी नीतेश राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आला. वणी, साकोली, तुमसर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर येथे विदर्भवादी कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या.

वाहतूक निरीक्षकांना युवासेनेचे निवेदन

0

गोंदिया,दि.26 : शिवसेना प्रणित युवासेना व विद्यार्थी सेनेच्या संयुक्तवतीने शहरातील वाहतूक व्यवस्थेला घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. शहरातील वाहतूक विस्कळीत असल्यामुळे शहरवासीयांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या प्रकारामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. करिता शहरातील पाल चौक ते बंगाली शाळा या मार्गावर भरधाव वेगात वाहन चालविण्याचे प्रकार चालत असल्याने येथे दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, बाजार परिसरात एकेरी पार्कींग पुन्हा सुरू करावी तसेच सणांच्या दिवसांत बाजारात चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हासंघटक प्रशांत कोरे व युवा सेनेचे उपजिल्हा संघटक हिमांशु कुथे यांच्या नेतृत्वात निवेदन देताना अभय मानकर, हर्षल पवार, विक्की नागरीकर, अनूप माणिकपुरी, योगेश बेलगे, सौरभ शर्मा, खुशाल निंबाळकर, संदेश निंबाळकर, विनायक मेंढे, जयेश चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाच्या विरोधात पीएमजेएसवाय अभियंत्याचे काम बंद आंदोलन सुरु

0

गोंदिया,दि.25- कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरे यांचा झालेल्या अपघातानंतर सोमवारला त्यांचे नागपूरच्या व्होकार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले.मृत्यू झाल्यानंतर मात्र रुग्णालय प्रशासनाने जोपर्यंत अडीच लाख रुपये भरणार नाही,तोपर्यंत मृतदेह सोपविण्यास नकार दिला होता.कंत्राटी कर्मचारी असल्याने तुटपुंज्या पगारात त्याचे घर चालायचे.पंरतू या अपघातामूळे त्याला जिव गमवावा लागला अशावेळी शासनानकडू मात्र कुठलीच मदत करण्यात आली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील कंत्राटी अभियंत्यांना आज दि.25 पासून शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवित काम बंद आंदोलनाला सुरवात केली आहे.यासंबधीचे निवेदन कार्यकारी अभियंता पंतप्रधान ग्रामसडक योजना,व अधिक्षक अभियंता पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या नावे गोंदिया येथील उपविभागीय अभियंता श्री देशमुख यांना गोंदिया जिल्हा पंतप्रधान ग्राम सडक योजना कंत्राटी अभियंता संघटनेच्यावतीने सोपविण्यात आले.
निवेदन देतेवेळी अरविंद बिसेन,भुपेश तुरकर,राजेश येळे,निखिल रत्नाकर,मदन पटले,राजेश पटले,निरज ब्राम्हणकर,विनोद जगणे,अजित ठवरे,हेमंत लिल्हारे,सौरभ लोखंडे,कृष्णा चव्हाण,मनोज काळे,सुनिता तुरकर,जितेंद्र रेवतकर,पुरुषोत्तम बिसेन,चंद्रशेखर पटले,राजेश बिसेन,किशोर रंगारी,ललीता तुरकर,निलेश मेश्राम,फनेंद्र माहुर्ले,हेमराज कुंभरे,नितेश भालाधरे,दर्शना वानखेडे,महेंद्र लिल्हारे,संदिप चुटे,योगराज कावळे,पंकज ढोमणे,धनराज भेदे आदी उपस्थित होते.
निवेदनात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अंतर्गत दिघोरे कुरखेडा तालुक्यात गेल्या १० वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत होते. गेल्या पाच तारखेला कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव या साईटवरून घरी परतत असताना त्यांच्या गाडीला एका भरधाव दुचाकीने धडक दिली. गडचिरोली जिल्ह्यात अपुèया वैद्यकीय सेवेमुळे दिघोरे यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उशीर झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय कापावा लागला होता. पोटाला जबर दुखापत झाल्याने त्यांचेवर तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांना डायलिसिस वर ठेवण्यात आले होते. अखेर १८ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचेवर काळाने झडप घातली.
उल्लेखनीय म्हणजे त्यांना उपचारासाठी तब्बल १७ लाखाचा खर्च आला. त्यापैकी ५ लाखाची मदत प्रधानमंत्री सडक योजनेतील कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली. परंतु, शासनाने त्यांना काडीचीही मदत केली नाही, ही शोकांतिका आहे. दिघोरे यांच्या मागे एक सहा वर्षाचा मुलगा, पत्नी व आईवडिलांच्या संगोपनाची जबाबदारी होती. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसारख्या योजना या अल्प मानधनावर कंत्राटी अभियंत्याकडून राबविल्या जातात. परंतु, त्यांच्या वैद्यकीय सुविधांची शासन कसलीही दखल घेत नाही, याचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.सोबतच धुळे येथील अभिजित युवराज पाटील यांचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाला तर गोंदिया येथील राजेश बिसेन,राजेश पटले हे साईटवरुन परत येत असताना त्यांचा अपघात झाला होता.त्यावेळी सुध्दा शासनाच्यावतीने कुठलीच मदत करण्यात आली नाही.अशाचप्रकारे शासनाची भूमिका असल्यास कंत्राटी अभियंत्यानी करावे तरी काय अशा प्रश्न उपस्थित करुन राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात केली आहे.

नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा

0

नागपूर,दि.25 : नागपुरात बजरंग दलाने पुन्हा एकदा सर्व कायदे धाब्यावर बसवून सशस्त्र शोभायात्रा काढण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हवेत शस्त्र फिरवून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी घेऊन भरपूर नारेबाजी केली. इतकेच नाही तर काही जणांच्या हाती परशूसुद्धा होते.शस्त्र हवेत फिरवणे आणि त्यांचे अशाप्रकारे प्रदर्शन करणे बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी कार्यकर्त्यांना सांगितले, तेव्हा हा प्रकार थांबला.पण पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत हा प्रकार कुणाच्या मार्गदर्शनात खपवून घेतला अशा टिका होऊ लागल्या आहेत.

मृत आढळली बिबटया मादी

0

वाशिम, दि. २५ : जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील कोळगाव विभागात गुरूवार, २५ आॅगस्ट रोजी सकाळी ३.५ ते ४ वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेथ आढळून आले. दोन-तीन दिवसांपूर्वीच ती मृत पावल्याची प्राथमिक माहिती असून, तीचे शव गुरूवारी दुपारी अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यकीय संस्थेत शवविच्छेदनाकरीता आणण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात वाशिम जिल्ह्यातच आढळून आलेल्या आजारी बिबटचा मृत्यू झाला होता. तर एक विहिरीत पडलेल्या बिबटास वनविभागाच्या चमूने जीवदान दिले होते. गुरूवारी आढळून आलेल्या मादी बिबट कसे मृत पावले हे शवविच्छेदनानंतरच सिद्ध होईल.

गडचिरोलीत फॉरेस्ट सेझ निर्मितीच्या हालचाली सुरु

0

गडचिरोली, दि.२५: सुमारे ७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योग निर्माण करण्यासाठी येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक पी.कल्याणकुमार यांनी ‘फॉरेस्ट सेझ’ निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हा अभिनव आणि ऐतिहासीक प्रस्ताव मंजूर झाला, तर जिल्ह्यात दरवर्षी ४०० कोटी रुपयांचा रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच प्रदूषणमुक्तीचा आयकॉन म्हणूनही या जिल्ह्याकडे बघितले जाईल, असे जाणकारांना वाटत आहे.
पी.कल्याणकुमार यांनी या जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा सादर केला. ते म्हणाले, जिल्ह्यात १२ लाख ८१ हजार ५०० हेक्टर वनजमीन आहे. या जमिनीत दीड लाख क्यूबिक मीटर लाकूड निर्मितीची क्षमता आहे. या माध्यमातून दीड हजार कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळू शकतो, तर त्यातील ४०० कोटी रुपये मजुरीपोटी गोरगरीब नागरिकांच्या खिशात जातील. २०१५-१६ मध्ये ६०० ग्रामसभांनी तेंदूपाने गोळा केली. त्यातून १३० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. या रकमेपैकी सुमारे ६५ कोटी रुपये मजुरांना मिळाले. जिल्ह्यातील एकूण जंगल क्षेत्रापैकी ५ लाख हेक्टर जमिनीवर बांबू उपलब्ध आहे. दरवर्षी १ लाख ७० हजार हेक्टरवर बांबू लागवड केल्यास १८० ते २०० गावांतील नागरिकांना मोठा रोजगार मिळू शकतो. यंदा १२२ गावांनी बांबू कटाईच्या कामाची मागणी केली होती. त्यातील १०० गावांनी यशस्वीरित्या हे काम केल्याने त्यांना प्रचंड मिळकत झाली. बांबूच्या माध्यमातून २५ लाख ते १ कोटीपर्यंत मजुरी मिळू शकते. तसेच येथील जंगलातून दरवर्षी १० लाख टन मोहफुले मिळतात. त्यातून २०० कोटी रुपये नागरिकांच्या हातात येऊ शकतात. मात्र केवळ लागवड करुन चालणार नाही, तर बांबू, मोहफुले, तेंदूपत्ता व अन्य गौण वनोपज आणि वनौषधीवर आधारित उद्योग येथे आले पाहिजेत. शिवाय सिरोंचा तालुक्यात फॉसिल पार्क उभारण्याचा मानस आहे. तेथे १० हजार वर्षे जुन्या झाडांचे फॉसिल्स मिळाले. ६५ हजार दशलक्ष वर्षांपूर्वीचे डायनासोरचे अवशेषही सापडले. एकाच ठिकाणी प्राणी आणि वनस्पतींचे फॉसिल्स आढळणारा देशातील हा एकमेव फॉसिल पार्क असावा, असे सांगून श्री.कल्याणकुमार यांनी तेथे टुरिझमच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले. लाकूड, गौण वनोपज, वनौषधी व टुरिझमच्या विकासासाठी वन औद्योगिक क्षेत्र निर्मितीचा वनविभागाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी शासनाने उद्योजकांना सबसिडी देऊन व आणखी पायाभूत सुविधा निर्माण करुन दिल्यास केवळ जंगलच या जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढवू शकतो, असे पी.कल्याणकुमार म्हणाले. जिल्ह्यात फॉरेस्ट इंडस्ट्रिअल झोन निर्माण करण्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठविला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अ‍ॅट्रासिटी प्रकरणातून जि.प.चे तत्कालीन १० पदाधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

0

तत्कालीन सीईओ डॉ.यशवंत गेडाम मारहाण प्रकरण

गोंदिया, ता. २५ : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत गेडाम यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन १० पदाधिकाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात चालले. अखेर आज, गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. त्रिवेदी यांनी दहाही पदाधिकाऱ्यांची अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, विनोद अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान आमदार विजय रहांगडाले, गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. किशोर गौतम, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पंचम बिसेन, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन पटले, माजी नगरसेवक संजय कुलकर्णी, बरकत अली सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य मोरेश्वर कटरे व माजी सभापती श्रावण राणा आदी पदाधिकारी २०१२ मध्ये जिल्हा परिषदेत सत्तारूढ होते. १३ डिसेंबर २०१२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत गेडाम यांच्या दालनात जाऊन या दहाही पदाधिकाऱ्यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. एवढेच नाही तर, धक्काबुक्की करून मारहाण केली, अशी तक्रार गेडाम यांनी पोलिसात केली. पोलिसांनी आरोपींविरूद्ध अनुसूचित जाती- जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालले. न्यायालयाने आज, गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी घेतली. जिल्हा सत्र न्यायाधीश त्रिवेदी यांनी दोन्ही पक्षांची बाजू समजून घेत अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून तत्कालीन दहाही पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे अ‍ॅड. डोये यांनी तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. टी. बी. कटरे, अ‍ॅड. कांतिलाल अग्रवाल, अ‍ॅड. निजा‘ शेख यांनी बाजू मांडली. उल्लेखनीय म्हणजे, या पदाधिकाऱ्यांनी गेडाम यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

युवा स्वाभीमानच्या पुढाकाराने बसंत ठाकूर यांचे आदोलन मागे

0

गोंदिया,दि.25-येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला शासकीय रुग्णालयाच्या प्रश्नाला घेऊन गेल्या 11 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते वंसत ठाकूर यांनी सुरु केेलेल्या आंदोलनाची सांगता बुधवारला गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डाॅ.फारुकी,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.पातुरकर यांच्या उपस्थितीत निंबु पाणी पाजून करण्यात आली.या दोन्ही रुग्णालयातील विविध समस्यापैकी 15 मागण्या येत्या एक महिन्याच्या आत पु्र्ण करण्याचे लेखी आश्वासन डाॅ.फारुकी यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.गोंदियाच्या रुग्मालयासबंधी आंदोलन सुरु असताना जिल्ह्यातीलच नव्हे तर स्थानिक एकाही आमदार खासदाराने या मुद्याकडे पाहिजे त्यापधद्तीने लक्ष दिले नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.तेव्हा युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी आमदार रवी राणा यांना याप्रकरणाची माहिती देत आंदोलनाला पाठिंबा जाहिर करुन ज्या मागण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे ते निकाली काढण्याची विनंती केली होती.त्यातच आ.राणा यांनी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन समस्या सोडवा नाहीतर मंत्रालयातच आंदोलन करण्याचा इशारा देताच प्रशासनही जागे झाले आणि आरोग्य उपसंचालकांना गोंदिया गाठावे लागले.आरोग्य उपसंचालक यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली त्यानंतर काही मागण्या मान्य करीत आंदोलन मागे घेण्याचे मान्य केले.त्यानुसार बुधवारला सायकांळी आंदोलन मागे घेण्यात आले.