शासनाच्या विरोधात पीएमजेएसवाय अभियंत्याचे काम बंद आंदोलन सुरु

0
19

गोंदिया,दि.25- कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरे यांचा झालेल्या अपघातानंतर सोमवारला त्यांचे नागपूरच्या व्होकार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले.मृत्यू झाल्यानंतर मात्र रुग्णालय प्रशासनाने जोपर्यंत अडीच लाख रुपये भरणार नाही,तोपर्यंत मृतदेह सोपविण्यास नकार दिला होता.कंत्राटी कर्मचारी असल्याने तुटपुंज्या पगारात त्याचे घर चालायचे.पंरतू या अपघातामूळे त्याला जिव गमवावा लागला अशावेळी शासनानकडू मात्र कुठलीच मदत करण्यात आली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील कंत्राटी अभियंत्यांना आज दि.25 पासून शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवित काम बंद आंदोलनाला सुरवात केली आहे.यासंबधीचे निवेदन कार्यकारी अभियंता पंतप्रधान ग्रामसडक योजना,व अधिक्षक अभियंता पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या नावे गोंदिया येथील उपविभागीय अभियंता श्री देशमुख यांना गोंदिया जिल्हा पंतप्रधान ग्राम सडक योजना कंत्राटी अभियंता संघटनेच्यावतीने सोपविण्यात आले.
निवेदन देतेवेळी अरविंद बिसेन,भुपेश तुरकर,राजेश येळे,निखिल रत्नाकर,मदन पटले,राजेश पटले,निरज ब्राम्हणकर,विनोद जगणे,अजित ठवरे,हेमंत लिल्हारे,सौरभ लोखंडे,कृष्णा चव्हाण,मनोज काळे,सुनिता तुरकर,जितेंद्र रेवतकर,पुरुषोत्तम बिसेन,चंद्रशेखर पटले,राजेश बिसेन,किशोर रंगारी,ललीता तुरकर,निलेश मेश्राम,फनेंद्र माहुर्ले,हेमराज कुंभरे,नितेश भालाधरे,दर्शना वानखेडे,महेंद्र लिल्हारे,संदिप चुटे,योगराज कावळे,पंकज ढोमणे,धनराज भेदे आदी उपस्थित होते.
निवेदनात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अंतर्गत दिघोरे कुरखेडा तालुक्यात गेल्या १० वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत होते. गेल्या पाच तारखेला कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव या साईटवरून घरी परतत असताना त्यांच्या गाडीला एका भरधाव दुचाकीने धडक दिली. गडचिरोली जिल्ह्यात अपुèया वैद्यकीय सेवेमुळे दिघोरे यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उशीर झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय कापावा लागला होता. पोटाला जबर दुखापत झाल्याने त्यांचेवर तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांना डायलिसिस वर ठेवण्यात आले होते. अखेर १८ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचेवर काळाने झडप घातली.
उल्लेखनीय म्हणजे त्यांना उपचारासाठी तब्बल १७ लाखाचा खर्च आला. त्यापैकी ५ लाखाची मदत प्रधानमंत्री सडक योजनेतील कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली. परंतु, शासनाने त्यांना काडीचीही मदत केली नाही, ही शोकांतिका आहे. दिघोरे यांच्या मागे एक सहा वर्षाचा मुलगा, पत्नी व आईवडिलांच्या संगोपनाची जबाबदारी होती. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसारख्या योजना या अल्प मानधनावर कंत्राटी अभियंत्याकडून राबविल्या जातात. परंतु, त्यांच्या वैद्यकीय सुविधांची शासन कसलीही दखल घेत नाही, याचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.सोबतच धुळे येथील अभिजित युवराज पाटील यांचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाला तर गोंदिया येथील राजेश बिसेन,राजेश पटले हे साईटवरुन परत येत असताना त्यांचा अपघात झाला होता.त्यावेळी सुध्दा शासनाच्यावतीने कुठलीच मदत करण्यात आली नाही.अशाचप्रकारे शासनाची भूमिका असल्यास कंत्राटी अभियंत्यानी करावे तरी काय अशा प्रश्न उपस्थित करुन राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात केली आहे.