युवा स्वाभीमानच्या पुढाकाराने बसंत ठाकूर यांचे आदोलन मागे

0
13

गोंदिया,दि.25-येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला शासकीय रुग्णालयाच्या प्रश्नाला घेऊन गेल्या 11 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते वंसत ठाकूर यांनी सुरु केेलेल्या आंदोलनाची सांगता बुधवारला गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डाॅ.फारुकी,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.पातुरकर यांच्या उपस्थितीत निंबु पाणी पाजून करण्यात आली.या दोन्ही रुग्णालयातील विविध समस्यापैकी 15 मागण्या येत्या एक महिन्याच्या आत पु्र्ण करण्याचे लेखी आश्वासन डाॅ.फारुकी यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.गोंदियाच्या रुग्मालयासबंधी आंदोलन सुरु असताना जिल्ह्यातीलच नव्हे तर स्थानिक एकाही आमदार खासदाराने या मुद्याकडे पाहिजे त्यापधद्तीने लक्ष दिले नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.तेव्हा युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी आमदार रवी राणा यांना याप्रकरणाची माहिती देत आंदोलनाला पाठिंबा जाहिर करुन ज्या मागण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे ते निकाली काढण्याची विनंती केली होती.त्यातच आ.राणा यांनी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन समस्या सोडवा नाहीतर मंत्रालयातच आंदोलन करण्याचा इशारा देताच प्रशासनही जागे झाले आणि आरोग्य उपसंचालकांना गोंदिया गाठावे लागले.आरोग्य उपसंचालक यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली त्यानंतर काही मागण्या मान्य करीत आंदोलन मागे घेण्याचे मान्य केले.त्यानुसार बुधवारला सायकांळी आंदोलन मागे घेण्यात आले.