चंद्रपूर,दि.२६ः मागील 14 वर्षा पासून नियमितपणे संपन्न होणारा बळीराजा महोत्सव यावर्षीही बलिप्रतिपदेला 22 ऑक्टोबर 2025 ला जिजाऊ लॉन समोरील पटांगणात विविध सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, व माधव गुरनुले, आंबेडकरवादी विचाराचे बंडुजी नगराळे, बहुजन एम्प्लॉयीस फेडरेशन चे अध्यक्ष राजकुमार जवादे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पी. एम. जाधव, मराठा सेवा संघांचे महादेवराव ढुमने, मुन्ना आवळे, सूर्यभानजी झाडें, नामदेवराव मुसळे, जेष्ठ कार्यकर्ते भास्करराव मुन, सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे, सामाजिक कार्यकर्ते कैलास बांबोडकर, भास्करराव सपाट, नवनाथ देरकर कबीरपंथी विज्ञान महाराज ई नी बळीराजा महोत्सव देशात मोठ्या प्रमाणावर सार्वत्रिक रित्या होण्याच्या निकडीवर मार्गदर्शन केले. सन 2000 ला नागभीड तालुक्यातील डोंगरगाव येथे पहिला बळीराजा उत्सव व बळीराजाचा कपटाने खून करणाऱ्या वामनाचे जाहीर दहन करण्यात आले होते.
सन 2011 पासून चंद्रपूर शहरात सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या वतीने हा सांस्कृतिक उत्सव साजरा करण्यात येतो. यात विविध संघटनाचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत असतात. यावर्षीही शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विदेशी आर्य वामनाचे दहन कोकोडे नामक बालक व मानकर ताईचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रजाहीत दक्ष, संविभागी व लोकप्रिय बळीराजचा जयजयकार करणाऱ्या व कपटी विदेशी आतंकवादी आर्य वामणी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला..यावर्षी देशामध्ये जनतेने ठिकठिकाणी बळीराजा महोत्सवाचे आयोजन केल्या बद्धल सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी लोकांचे आभार मानले. शेवटी बळीराजाच्या आगमनाचे मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला..





