गोंदिया (खेमेंद्र कटरे) :महादेवराव शिवणकर राज्याचे मंत्री असताना भंडारा जिल्ह्याची विभागणी झाली. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवणकर यांनी प्रभावशाली भूमिका बजावली होती. त्यानंतरच्या काळात मात्र जिल्ह्यावर कायमच बाहेरचे पालकमंत्री लादण्यात आले. या पूर्वीचे पालकमंत्री तर वर्षातून फक्त झेंडावंदन करण्याकरिताच येत होते. त्यामुळे त्यांना ‘झेंडामंत्री’ अशी बिरुदावलीदेखील लाभली.या १५ आँगस्टकरीता तर झेंडावंदनाच्या कार्यक्रमावरुनही नाराजीनाट्य दिसून आले.त्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी गोंदियात येत जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन वास्तुचे उदघाटन करीत जिल्हा नियोजन समितीची सभा घेत विविध कामांना मंजुरी दिली.त्या कामांच्या मंजुरीनंतच माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक राष्ट्रवादीचे नेते यांच्यासह महायुतीतील पक्षांनी पालकमंत्र्याच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.आणि दिवाळीपुर्वीच बाबासाहेब पाटील यांना पक्षाच्या बैठकीत गोंदियाचे पालकमंत्री पद सोडत असल्याचे जाहिर केले.त्यानंतर गोंदिया जिल्ह्याला १४ वे पालकमंत्री म्हणून राज्याचे राज्यमंंत्री इंद्रनील नाईक हे अधिकृत आज(दि.२७)गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत.
जिल्हा निर्मितीच्या २६ वर्षात गोंदिया जिल्ह्याला १४ पालकमंत्री मिळाले असून ११ पालकमंत्री हे जिल्ह्याबाहेरील राहिले आहेत.तर सर्वाधिक काळ अनिल देशमुख यांना पालकमंत्री पदाचा मान मिळालेला आहे.
स्थानिक पालकमंत्र्यांच्याबाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे.जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर, राजकुमार बडोले वगळता नेहमी इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ५ वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाचवे पालकमंत्री मिळाले होते.त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत गोंदिया जिल्ह्यातील ४ ही विधानसभा(तिरोडा,गोंदिया व देवरी-आमगाव भाजप तर अर्जुनी मोरगाव राकाँ अजित पवार) महायुतीच्या ताब्यात आल्या.परंतु यांना डावलत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांना पालकमंत्री पद देण्यात आले.पाटील जेव्हा आपल्या पहिल्याच दौर्यात गोंदियाला आले तेव्हा त्यांनीही पालकमंंत्री स्थानिकच हवा आम्ही काय वर्षातून तीन बैठकांना येऊ असे म्हणत आपलीही नाराजी दर्शवली होती.आता त्यांनी गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे गोंदियाचे पालकमंत्री झालेले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.राज्यात महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. गोंदिया जिल्ह्य़ात तिरोडा,आमगाव/देवरी,गोंदिया, व अर्जुनी मोरगाव या चारही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार निवडुन आले.अशात गोंदिया जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.चार नवनिर्वाचीत आमदारांमधुन कुणाला मंत्रीपदाची लाॅटरी लागणार यांची प्रचंड उत्सुकता जिल्हावासियांना लागली होती.मात्र कुणाला मंत्रीपद द्यायचे याची चाबी खासदार प्रफुल पटेल यांचेच हातात असतांना त्यांनी जिल्ह्यातील आमदाराला का डावलले संशोधनाचा विषय आहे.२०१९ च्या निवडणूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली तेव्हाही राष्ट्रवादी व भाजपचे आमदार होते,मात्र त्यावेळीही पटेलांनी बाहेरचाच पालकमंत्री या जिल्ह्याला लादला.
गोंदियात यापूर्वी दत्ता मेघे, विजयकुमार गावित, नाना पंचबुद्धे यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
गोंदियाचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहण्याचा बहुमान अनिल देशमुख यांनाच मिळाला. ते १२ वर्षे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्री अनिल देशमुख हे समीकरणच झाले होते. देशमुखांची नाळ गोंदिया जिल्ह्याशी चांगलीच जुळली होती. आघाडीचे सरकार आले की, खेड्यापाड्यातील व्यक्ती आपला पालकमंत्री अनिल देशमुखच होणार असे ठामपणे सांगायचे. या दरम्यान, देशमुख फक्त शासकीय ध्वजारोहण व विशेष कार्यक्रमप्रसंगीच येत असल्याने त्यांची झेंडामंत्री म्हणून ओळख विरोधकांनी तयार केली होती. मात्र जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी त्यांचा कायम संपर्क होता.
मुनगंटीवारही बैठक पालकमंत्री निघाले
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांंनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात 3- 4 बैठकांच्या निमित्तानेच गोंदियाला भेट दिली.झेंडावंदनाला मात्र त्यांनी हजेरी लावली नाही.पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या डीपीडीसी बैठकीला दिवाळीपु्र्वी आले.त्यानंतर ते मार्चमध्ये डीपीडीसीच्या बैठकीला आले.नागझिरा व्याघ्रप्रकल्पात वाघ सोडायला आले असे महत्वाचे इव्हेंंट वगळले तर मुनगंटीवारांनीही जिल्ह्याकडे पालकमंत्री म्हणून काही खास न केल्याने ते बैठक व इव्हेंटमंत्रीच ठरले.
दोन पालकमंत्री तुरुंगवासी





