23.6 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home राजकीय गोंदियाचे १४ वे पालकमंत्री इंद्रनिल नाईक घेणार आज डीपीडीसीची बैठक

गोंदियाचे १४ वे पालकमंत्री इंद्रनिल नाईक घेणार आज डीपीडीसीची बैठक

0
256
गोंदिया जिल्ह्याला २६ वर्षांत मिऴाले १४ पालकमंत्री

गोंदिया (खेमेंद्र कटरे) :महादेवराव शिवणकर राज्याचे मंत्री असताना भंडारा जिल्ह्याची विभागणी झाली. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवणकर यांनी प्रभावशाली भूमिका बजावली होती. त्यानंतरच्या काळात मात्र जिल्ह्यावर कायमच बाहेरचे पालकमंत्री लादण्यात आले. या पूर्वीचे पालकमंत्री तर वर्षातून फक्त झेंडावंदन करण्याकरिताच येत होते. त्यामुळे त्यांना ‘झेंडामंत्री’ अशी बिरुदावलीदेखील लाभली.या १५ आँगस्टकरीता तर झेंडावंदनाच्या कार्यक्रमावरुनही नाराजीनाट्य दिसून आले.त्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी गोंदियात येत जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन वास्तुचे उदघाटन करीत जिल्हा नियोजन समितीची सभा घेत विविध कामांना मंजुरी दिली.त्या कामांच्या मंजुरीनंतच माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक राष्ट्रवादीचे नेते यांच्यासह महायुतीतील पक्षांनी पालकमंत्र्याच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.आणि दिवाळीपुर्वीच बाबासाहेब पाटील यांना पक्षाच्या बैठकीत गोंदियाचे पालकमंत्री पद सोडत असल्याचे जाहिर केले.त्यानंतर गोंदिया जिल्ह्याला १४ वे पालकमंत्री म्हणून राज्याचे राज्यमंंत्री इंद्रनील नाईक हे अधिकृत आज(दि.२७)गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत.

जिल्हा निर्मितीच्या २६ वर्षात गोंदिया जिल्ह्याला १४ पालकमंत्री मिळाले असून ११ पालकमंत्री हे जिल्ह्याबाहेरील राहिले आहेत.तर सर्वाधिक काळ अनिल देशमुख यांना पालकमंत्री पदाचा मान मिळालेला आहे.

स्थानिक पालकमंत्र्यांच्याबाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे.जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर, राजकुमार बडोले वगळता नेहमी इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ५ वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाचवे पालकमंत्री मिळाले होते.त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत गोंदिया जिल्ह्यातील ४ ही विधानसभा(तिरोडा,गोंदिया व देवरी-आमगाव भाजप तर अर्जुनी मोरगाव राकाँ अजित पवार) महायुतीच्या ताब्यात आल्या.परंतु यांना डावलत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांना पालकमंत्री पद देण्यात आले.पाटील जेव्हा आपल्या पहिल्याच दौर्यात गोंदियाला आले तेव्हा त्यांनीही पालकमंंत्री स्थानिकच हवा आम्ही काय वर्षातून तीन बैठकांना येऊ असे म्हणत आपलीही नाराजी दर्शवली होती.आता त्यांनी गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे गोंदियाचे पालकमंत्री झालेले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.राज्यात महायुतीने  घवघवीत यश मिळविले आहे. गोंदिया जिल्ह्य़ात तिरोडा,आमगाव/देवरी,गोंदिया, व अर्जुनी मोरगाव या चारही  विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार निवडुन आले.अशात गोंदिया जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.चार नवनिर्वाचीत आमदारांमधुन कुणाला मंत्रीपदाची लाॅटरी लागणार यांची प्रचंड उत्सुकता जिल्हावासियांना लागली होती.मात्र कुणाला मंत्रीपद द्यायचे याची चाबी खासदार प्रफुल पटेल यांचेच हातात असतांना त्यांनी जिल्ह्यातील आमदाराला का डावलले संशोधनाचा विषय आहे.२०१९ च्या निवडणूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली तेव्हाही राष्ट्रवादी व भाजपचे आमदार होते,मात्र त्यावेळीही पटेलांनी बाहेरचाच पालकमंत्री या जिल्ह्याला लादला.

गोंदिया विधानसभेचे भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी पहिल्यांदा गोंदिया मतदारसंघात कमल फुलवित इतिहास घडविला आहे.तर सलग तिसयांदा निवडून येत तिरोडा भाजपाचे आमदार विजय रंहागडाले यांनी हॅट्रीक घेत या मतदारसंघातूनही सलग निवडून येण्याचा इतिहास रचला.निवडणूक प्रचाराच्यावेळी प्रफुल पटेल व परिणय फुके यांनी विनोद अग्रवाल यांना निवडून द्या पालकमंत्री करु अशी जाहीर घोषणा केली होती.तर विजय रहागंडाले यानी मला निवडून द्या मी मंत्री होणार यावर मते मागितली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचे आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांची आमदारकीची तिसरी वेळ आहे.यापुर्वी आमदार बडोले यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन यशस्वीरित्या काम केले आहे.आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात सामाजीक न्याय मंत्रालय काय असते हे बडोले साहेबांनी संपुर्ण महाराष्ट्रासह देशाला दाखवुन दिले होते तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन बडोले यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला होता.प्रफुल्ल पटेल यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभेत प्रचाराची कमान एकाकी सांभाळली होती हे विशेष.त्यांनी प्रत्येक सभेत आपनाला राजकुमार बडोले यांना आमदार बनविण्यासाठी नाही तर अर्जुनी मोर विधानसभेचा मंत्री बनविण्यासाठी मतदान करायचे आहे हे आवर्जुन सांगितले होते.व तसेच झाले सुध्दा.मात्र एकालाही मंत्रीपद पटेलांनी का मिळू दिले नाही,आणि भाजपनेही आपल्या आमदाराकंडे का दुर्लक्ष केले हे कळेनासे झाले.
 युती सरकारच्या काळात भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. पहिले पालकमंत्री प्रा. महादेवराव शिवणकर हे होते. त्यानंतर मात्र गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री लाभले नाही. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून दुसeऱ्यांदा निवडून आलेले राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री झाले. त्यांना गोंदियाचे पालकमंत्री करण्यात आले. १४ वर्षांनंतर मूळ जिल्ह्यातील व्यक्ती पालकमंत्री झाले होते. मात्र त्यांना शेवटच्या सहा महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डॉ. परिणय फुके यांना गोंदियाचे पालकमंत्रिपद मिळाले होते. सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. आणि पुन्हा गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्याकडे आली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताकाळात देशमुख गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते.जिल्ह्याचे पालकमंत्री पद साभांळणारे अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुखांनी मंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर नवाब मलीक यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले. मात्र तेदेखील मंत्रीपदावरून पायउतार झाल्याने मविआ सरकार असेपर्यंत प्राजक्त तनपुरे पालकमंत्री होते.त्यानंतर 30 जून रोजी राज्यात सत्तांतर झाले.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्रीपद आले.सरकारची वर्षपूर्ती झाली असताना पुन्हा सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाला.त्यानुसार 4 आँक्टोंबरला जाहिर झालेल्या यादीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व आल्याने चार वर्षांत पाच पालकमंत्री गोंदिया जिल्ह्याला लाभले आहे.

गोंदियात यापूर्वी दत्ता मेघे, विजयकुमार गावित, नाना पंचबुद्धे यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

गोंदिया आणि देशमुख हे समीकरण

गोंदियाचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहण्याचा बहुमान अनिल देशमुख यांनाच मिळाला. ते १२ वर्षे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्री अनिल देशमुख हे समीकरणच झाले होते. देशमुखांची नाळ गोंदिया जिल्ह्याशी चांगलीच जुळली होती. आघाडीचे सरकार आले की, खेड्यापाड्यातील व्यक्ती आपला पालकमंत्री अनिल देशमुखच होणार असे ठामपणे सांगायचे. या दरम्यान, देशमुख फक्त शासकीय ध्वजारोहण व विशेष कार्यक्रमप्रसंगीच येत असल्याने त्यांची झेंडामंत्री म्हणून ओळख विरोधकांनी तयार केली होती. मात्र जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी त्यांचा कायम संपर्क होता.

मुनगंटीवारही बैठक पालकमंत्री निघाले

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांंनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात 3- 4 बैठकांच्या निमित्तानेच गोंदियाला भेट दिली.झेंडावंदनाला मात्र त्यांनी हजेरी लावली नाही.पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या डीपीडीसी बैठकीला दिवाळीपु्र्वी आले.त्यानंतर ते मार्चमध्ये डीपीडीसीच्या बैठकीला आले.नागझिरा व्याघ्रप्रकल्पात वाघ सोडायला आले असे महत्वाचे इव्हेंंट वगळले तर मुनगंटीवारांनीही जिल्ह्याकडे पालकमंत्री म्हणून काही खास न केल्याने ते बैठक व इव्हेंटमंत्रीच ठरले.

दोन पालकमंत्री  तुरुंगवासी

जिल्ह्याचे सलगरित्या दोन पालकमंत्री(अनिल देशमुख आणि नवाब मलिक )पद भूषविणाऱ्या दोन मंत्र्यांना ईडीच्या चौकशी नंतर अटकेला सामोर जावे लागले.विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रावादी सत्ता असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी 2005 ते 2009 व 2009 ते 2014 या साली गोंदियाचे पालकमंत्री पद भूषविले. पुन्हा महाविकास आघाडी सरकार तयार होताच 2019 साली जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांनी भूषविले.
blank