
सालेकसाः झाडांची अनियंत्रित तोड, अतिक्रमण, जंगलातील आगी आणि मानवी स्वार्थ यामुळे निसर्ग रडत आहे. जर आपण आपल्या वनसंपदेचं जतन केलं, तरआपल्या भागात वन पर्यटन केंद्रे, होम स्टे व्यवसाय, स्थानिक हस्तकला विक्री, आणि मार्गदर्शन सेवा यासारख्या अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यामुळे ग्रामस्थांचे उत्पन वाढेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त होईल. मात्र, आपण जर या वनांचे योग्य संवर्धन केले, तर हेच वन पर्यटन विकासाचे केंद्रबिंदू बनू शकतात. वन पर्यटन म्हणजे निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग, जंगल सफारी, ट्रेकिंग, वॉटरफॉल साइट्स, वन्यजीव अभयारण्ये, पर्यावरण शिक्षण केंद्रे यासर्व गोष्टी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढवू शकतात, स्थानिकांना रोजगार देऊ शकतात, आणि आपल्या देशाची निसर्गसंपन ओळख जगासमोर उभी करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हाजराफॉल असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी टि. एच. ढमढेरे यांनी केले.
ते यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला हाजराफॉल चा ११ वा वर्धापन दिन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला (हाजराफॉल) चा ११ वा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हाजराफॉल परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. जल जंगल जमीनचे रक्षण करणारे धरती आबा बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा अर्चना करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय वन अधिकारी टि.एच. ढमढेरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के, वन व्यवस्थापन समिती नवाटोलाचे अध्यक्ष मरस्कोल्हे, उपाध्यक्ष पवन ऊईके, ग्रामपंचायत कोसमतर्राचे सरपंच सिंधुताई घरत, उपसरपंच सुलेलाल मडावी, पवन पाथोडे, क्षेत्र सहाय्यक बी.ए. कोहरे, जे. जे. खान, एस. एम. पवार, चौव्हाण, नंदेश्वर, बनोठे, सर्व समितीचे सदस्य व गावकरी, प्रामुख्याने उपस्थित होते. समितीच्या स्थापनेपासून ते वर्तमान स्थिती पर्यंत समितीचे कार्य विषयी सविस्तर माहिती समितीचे अध्यक्ष मरस्कोल्हे यांनी प्रस्ताविकेच्या माध्यमातून मांडली. कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार पवन पाथोडे, सरपंच सिंधुताई घरत व समितीचे माजी सचिव वनरक्षक सुरेश राहांगडाले यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक किशोर फुंडे तर आभार प्रदर्शन संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सचिव एस. के. बागडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे, उपाध्यक्ष पवन ऊईके, सचिव सतीश बागडे, प्रमोदकुमेटी, नरेंद्र मडावी, ममता कोडवती, लक्ष्मी मसराम, महेश वरखडे, संजय चौधरी, रवी मरस्कोल्हे, रोशन मडावी, दीपक चौधरी, निलेश चौधरी, विजय मलये, रवींद्र फुफुंडे, कृष्णा मडावी, रेवलजी उईके, राजेंद्र फरदे, वरखडे वरखडे, रेवल उईके आदींनी विशेष परिसर घेतले.





