41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता मोटारसायकल चोरट्यास ढिमरटोलीजवळ केली अटक

मोटारसायकल चोरट्यास ढिमरटोलीजवळ केली अटक

0
83

blank

गोंदिया : शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने मोटारसायकल चोरट्याला मोटारसायकलसह बुधवारी (दि.२१) अटक केली. अनिकेत बाबासाहेब करजुले (वय ३३ वर्षे) राहणार केळगाव (अहिल्यानगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार त्यांच्या घरासमोरून ११ जानेवारी रोजी सकाळी ७वाजताच्या दरम्यान टी.व्ही.एस कंपनीची १ लाख ७५ हजार रुपयांची मोटारसायकल चोरीला गेली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस स्टेशन तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता.तक्रारीवरून शहर पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध सुरू केला. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर एक संशयास्पद व्यक्ती ढिवरटोलीजवळ एक नवीन गाडी नंबरप्लेटविना उभी करून उभा असल्याची माहिती मिळताच तेथे जावून आरोपीला ताब्यात घेतले.

blank