37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ माहुली येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत

माहुली येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत

0
452

blank

; आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते धनादेश वितरण

सडक अर्जुनी-3 एप्रिल- तालुक्यातील माहुली येथील लक्ष्मीबाई हेमराज सयाम यांचा दिनांक ३० जानेवारी रोजी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर शासनाकडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, ती मदत आमदार राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाली आहे.

आमदार राजकुमार बडोले यांनी माहुली येथे भेट देऊन मृत महिलेच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली व शासनाकडून मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्द केला.या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे, वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने, सरपंच उषा मेश्राम, उपसरपंच विशाल पर्वते, पोलीस पाटील पुष्पा कापगते तसेच महेश मेश्राम, सचिन कापगते, ईश्वरजी सयाम, मुन्ना कापगते आदी मान्यवर उपस्थित होते.

blank