28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News माजी आमदार बच्चू कंडूवर खुनाचा आरोप,तक्रार दाखल

माजी आमदार बच्चू कंडूवर खुनाचा आरोप,तक्रार दाखल

0
110

अमरावती,दि.०३ः अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांना अपघाताचा बनाव करून जिवानिशी ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाची अधिकृत माहिती दिली. प्राप्त तक्रारीनुसार, डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या ‘कुरळपूर्णा’ येथील निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी इसमाने मिळून अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याबाबत चर्चा केली होती. या संभाषणाचे रेकॉर्डिंग एका गोपनीय साक्षीदाराने आपल्या मोबाईलमध्ये केले होते, जे आता पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.