26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नाही तर विचार होते-प्राचार्य कमल कापसे

विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नाही तर विचार होते-प्राचार्य कमल कापसे

0
46

शासकीय आश्रम शाळा पुराडा येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
देवरी-शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अध्यक्ष स्थानावरून बोलताना शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांनी सांगितले की बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांप्रमाने
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, तसेच भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,
राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, भारताचे पहीले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे निर्माते,बोधीसत्त्व, विश्वरत्न,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नाही तर विचार होते आपण त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास व शिक्षणाविषयीची जिद्द ध्येयवाद, सातत्य आणि कठोर परिश्रम आत्मसात केल्यास यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य कमल कापसे यांनी केले.जीवनात अशक्य असे काहीही नाही फक्त आपण ते प्राप्त करण्याच्या मार्गाने वाटचाल करणे आवश्यक असते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले.

यावेळी प्रास्ताविकेतून प्रा.मेघा धोपते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर अत्यंत मार्मिक असा प्रकाश टाकून त्यांच्या कार्याच्या गौरवगाथा सांगीतल्या.त्याचप्रमाणे प्रा.वैजयंती नेणावत यांनी सुद्धा स्वातंत्र्य समता बंधुत्व हे आपल्या देशाला बाबासाहेबांनी दिलेली स्त्री असल्याचे सांगत मार्गदर्शन केले.त्याचे प्रमाणे प्राथमिक शिक्षक मोरेश्वर धवले यांनी सुद्धा यावेळी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमातील लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे शाळेचे अधीक्षक अजय सोनुले यांनी बाबासाहेबांनी बहुजनांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची गुणगौरव एका ह्रदयस्पशी गीतातून सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित अधिक्षिका पौर्णिमा जोशी,प्रा.संदीप बिसेन, प्राथमिक शिक्षक वर्षा सांगोळे,सुरेखा कोरे, हर्षवर्धन दवने, नर्स दिपमाला लाडे, कला शिक्षक रोशनी ताटी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना चाकलेट खाऊ देण्यात आले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन माध्यमिक शिक्षक पवन वंजारी यांनी केले. तर उपस्थितांचे ऋणनिर्देश प्र.स.मयुर राठोड यांनी केले.