35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ चंगेरा येथे लघु एमआयडीसी सुरु करा,पालकमंत्र्यांना तुरकर यांचे निवेदन

चंगेरा येथे लघु एमआयडीसी सुरु करा,पालकमंत्र्यांना तुरकर यांचे निवेदन

0
43

blank

गोंदिया,दि.२१- महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या चंगेरा परिसरातील शासकीय जागेवर लघु औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)स्थापन करुन या परिसरातील विकासाला चालना देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष केतन तुरकर यांनी निवेदनातून पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांना केली आहे.गेल्या काही वर्षापुर्वी चंगेरा येथे पेपर तयार करण्याचा कारखाना होता,मात्र सरकारी धोरण व कामगारांच्या समस्यामुळे सदर कारखाना बंद पडल्याने या परिसरातील हजारो कामगारांना रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.त्यातच सुमारे २०० एकर जागा अद्यापही रिकामी असल्याने आणि जवळूच वाघनदी वाहत असल्याने यापरिसरात लघु एमआयडीसी सुरु करुन उद्याेग सुरु केल्यास महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील नागरिकांना सुध्दा यापासून अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतात,त्यामुळे तत्काळ औद्योगिक विकास महामंंडळाकडून सर्वेक्षण करुन सदर पडिक जागा आरक्षित करुन उद्योग सुरु करण्याची मागणी तुरकर यांनी केली आहे.पालकमंत्री नाईक यांना निवेदन देतेवेळी माजी आमदार राजेंद्र जैन,नरेश माहेश्वरी,प्रेम रहागंडाले,जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे,राजलक्ष्मी तुरकर,डी.यु.रहागंडाले,सतिश देशमुख आदी उपस्थित होते.

blank