गोंदिया, दि.29 : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ दि.1 मे 2026 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने पोलीस मुख्यालय मैदान कारंजा (गोंदिया) येथे सकाळी 8.00 वाजता राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी इतर कार्यालयाने अथवा संस्थेने या दिवशी सकाळी 7.15 ते 9.00 च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ आयोजित करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9.00 च्या नंतर आयोजित करावा, असे दि.23 एप्रिल 2026 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदान कारंजा (गोंदिया) येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास नागरिकांनी सकाळी 8.00 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्या हस्ते सकाळी 7.00 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर येथील नवीन प्रशासकीय इमारत परिसरात आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सकाळी 7.00 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.





