गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे, १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला ६६ वर्षे पूर्ण झाले . संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सीपीआयचे अतुलनीय योगदान होते. या चळवळीत १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले, ज्यात बहुसंख्य कामगार वर्गातील लोक शहीद झाले. या प्रसंगाचे स्मरण करून, सीपीआयने पक्षाची अर्जुनी (तालुका गोंदिया) शाखा मार्फत ‘हर जन संवाद’ कार्यक्रमांतर्गत १ मे, कामगार दिन आणि संयुक्त महाराष्ट्र दिनापासून ते ३० जून २०२६ पर्यंत गावात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. मिलिंद गणवीर, तालुका सचिव कॉ. प्रल्हाद उके आणि शाखा सचिव कॉ. जितेंद्र गजभिये यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आणि पत्रके वाटून स्वातंत्र्य चळवळीतील आणि स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्र उभारणीतील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. तसेच वाढती महागाई आणि बेरोजगारी, सार्वजनिक शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक सेवांचा अभाव, किमान वेतनाचा अभाव, सेवा सुरक्षा, निवृत्तीवेतन, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला न मिळणारा फायदेशीर भाव, कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिलांवरील वाढता अत्याचार, सार्वजनिक उद्योगांचे वेगाने होणारे खाजगीकरण, जनविरोधी सार्वजनिक सुरक्षा कायदे इत्यादी मुद्दे ग्रामीण जनतेसमोर मांडण्यात आले आणि सीपीआयच्या जनआंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेत कॉम्रेड मिलिंद गणवीर, प्रल्हाद उके, जितेंद्र गजभिये, क्रांती गणवीर, सरस्वता हरिणखेडे, उमेदलाल कटरे , राकेश हिरदे , आनंद गणवीर, आनंद कटरे , सचिन पटले, सुकराम रहांगडाले , कारू शहारे, सूर्यचंद सोनवणे, टेकलाल तुरंकर, देवणबाई हरिनखेडे , योगेश कटरे , .सुनंदा सोनवणे, पूजा कटरे , पारणबाई साऊसकार, रूपा कटरे आदी महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





