23.9 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home राजकीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज भंडार्‍यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज भंडार्‍यात

0
26

भंडारा दि. १८  : भंडारा विधानसभा क्षेत्राचे १५ वर्षे प्रतिनिधत्व केलेले माजी आमदार स्व.राम आस्वले यांच्या स्मृतिनिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने नागरी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १0.१0 वाजता श्री गणेश हायस्कूलचे प्रांगण, राजीव गांधी चौक, भंडारा येथे हा श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय भूतल परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवारला सकाळी भंडारा येथे येत आहेत. १0.३0 वाजता ते श्रध्दांजली कार्यक्रमाला उपस्थित राहतील. श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले राहतील. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, चंद्रशेखर रोकडे, अरविंद भालाधरे, बाबू ठवकर यांनी केले आहे.