पवनीच्या नगराध्यक्षांसह सात नगरसेवक अपात्र

0
17

भंडारा दि. १८ : पाच वर्षांपूर्वी पवनी नगर पालिकेत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली. अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळविणी करून नगराध्यक्षपद मिळविल्याप्रकरणी ‘त्या’ सात नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी खारीज केली. त्यामुळे शिवसेनेचे हे सातही नगरसेवक अपात्र ठरले आहेत.
शिवसेनेला खिंडार पाडत रजनी मोटघरे या सहा नगरसेवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने २५ जुलै २0१४ ला नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते मोहन सुरकर यांनी भंडारा जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली. जिल्हाधिकार्‍यांनी २२ डिसेंबर २0१५ रोजी नगराध्यक्षासह सात नगरसेवकांना अपात्र घोषित केले.मोटघरे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली. उच्च न्यायालयाने भंडारा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम ठेऊन ९ ऑगस्ट २0१६ रोजी ही याचिका खारीज केली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देत मोटघरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी भंडारा जिल्हाधिकारी व उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेऊन मोटघरे यांच्यासह नरेश बावनकर, तुळशिदास वंजारी, हिरा मानापुरे, अविना मुंडले, सुरेखा देशमुख, माया खापर्डे या सात नगरसेवकांना अपात्र ठरविले.(