24.8 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home महाराष्ट्र शिवाजी पार्कवर दिमाखात पथसंचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर

शिवाजी पार्कवर दिमाखात पथसंचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर

0
25

मुंबई,दि.26- 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आज (गुरुवार) पथसंचलन पार पडले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पोलिसांचे जवान, निमलष्करी दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान या परेडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी चित्तथरारक प्रात्याक्षिकेही सादर करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांनी परेडला एक वेगळी रंगत आणली. त्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी ध्वजारोहण केले. यावेळी मुंबई पोलिसांनी मानवंदना दिली.