गणतंत्रदिनी टेमनीतील सैनिकांचा शाळेच्यावतीने सत्कार

0
34

गोंदिया,berartimes दि.26 जानेवारी- तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा टेमणी केंद्र-आसोलीच्यावतीने आज टेमनी येथील शाळेच्या मुख्य आवारात पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमप्रसंगी गावात प्रभातफेरी काढून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी गावातील जे युवक देशाच्या रक्षणासोबतच सेवेसाठी सैन्यात जाऊन काम करीत आहेत.त्या सैनिकांचा आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेच्यावतीने जिल्हा परिषद सदस्या खुशबूताई जितेश टेंभरे यांच्यासह सरपंच विनोद मेश्राम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मलगाम व उपाध्यक्ष श्रीमती बोरकर यांच्याहस्ते त्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच शिवलाल नेवारे,ग्रामपंचायत सदस्य, शाला व्यवस्थापन समितीचे सदस्य,उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौःएम.एच.पटले ,श्रीःएस.आर.भेलावे.एस.पी.कुंभलकर.डि.व्ही.बिसेन.जि.एस.रहांगडाले.कुःसुषमा श्रीरामे.अर्पणा तुरकर.पुष्पा हुमे.वैशाली राऊत आदी उपस्थित होते.देशाच्या सिमेवर तैनात असलेले टेमणी येथील राजेश ठाकुर.रामकृष्ण गायधने.नितीन राऊत.चंद्रकिशोर पटले.महेंद्र पटले.आकाश बिसेन या सर्व सैनिकांचा सहाय्यक शिक्षक एस.पी.कुंभलकर यांच्या कार्यतत्परतेमुळे ध्वजारोहणानंतर सत्कार करुन गणतंत्र दिन साजरा करण्यात आला.सैनिकांच्या उपस्थितीमुळे आजच्या कार्यक्रमाला विशेष महत्व लाभले आणि विद्यार्थ्यांना देशाच्यासिमेवर तैनात राहणार्या सैनिकांचे काय महत्व असते ते यावेळी कळले.गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परशुराम विद्यालय मोहगावात ध्वजारोहण
गोरेगाव तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु. येथे ६८ वा प्रजासत्ताक दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आंतरशालेय क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदिशप्रसाद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी गावातील मान्यवर सरपंच हेमलता हरिणखेडे,श्रीमती चव्हाण, के.टी.पटले,शाळा समिती अध्यक्ष बिसेन,श्रीमती पुसाम तसेच शाळेचे शिक्षक डी.डी.चौरागडे,पी.एम.चुटे,भारती बिसेन(कटरे),बी.सी.गजभिये,टी.एफ.इळपाचे,व्ही.एस.मेश्राम,पेपराज पारधी,मुन्ना पारधी,दिनेश बोपचे यांच्या शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.