अनेक शाळांकडून अनुदान निर्धारणाचे प्रस्ताव नाही

0
14

गडचिरोली,दि.26: गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खासगी अनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकडून सन २०१५-१६ या वर्षीच्या अनुदान निर्धारणाचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद कार्यालयास प्राप्त झाले नाही. त्यामुळे वेतनेत्तर अनुदान शाळांना देण्यास अडचण निर्माण झाली आहे.माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे सन २०१५-१६ या वर्षीचे अनुदान निर्धारण करावयाचे असल्याने ३१ जानेवारी २०१७ पर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयास सादर करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम यांनी केले आहे.विहीत मुदतीत शाळांचे प्रस्ताव प्राप्त न झाल्यास सन २०१५-१६ चे वेतनेत्तर अनुदान संबंधित शाळेस प्राप्त होणार नाही. अनुदान निर्धारण केल्याशिवाय वेतनेत्तर अनुदान देण्यात येऊ नये, असा शासन आदेश आहे. सन २०१४-१५ चे अनुदान निर्धारण आदेश शाळांनी प्राप्त करून घ्यावेत व सदर रक्कम प्राप्त केल्याबाबतचे उपयोगीता प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयास त्वरित सादर करावे, असे शिक्षणाधिकारी आत्राम यांनी म्हटले आहे.