30.7 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home राजकीय बसपचा खरा अर्थ ‘बहनजी संपत्ती पार्टी’ -पंतप्रधान नरेंद्र मोदी

बसपचा खरा अर्थ ‘बहनजी संपत्ती पार्टी’ -पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
28

जालौन दि.20:– नोटाबंदीचा निर्णय हा केंद्र सरकारने पूर्ण तयारनिशी घेतला नव्हता, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती करतात. पण कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय जाहीर केल्यामुळे मायावतींना त्यांच्याजवळील पैशाची योग्य व्यवस्था लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. सोमवारी उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील ओराई येथील प्रचारसभेत मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नोटाबंदीचा निर्णय अचानक जाहीर केला यापेक्षा या अनपेक्षित घोषणेने तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, या गोष्टीवर मायावती यांचा आक्षेप आहे. त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या नावाचा अर्थ आता ‘बहनजी संपत्ती पार्टी’ असा झाल्याची खोचक टीका मोदी यांनी केली.