24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home राजकीय मराठी माणसाच्या मनगटातील जोर दाखवून दिला – उद्धव ठाकरे

मराठी माणसाच्या मनगटातील जोर दाखवून दिला – उद्धव ठाकरे

0
35

मुंबई, दि. 8 – मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकला असून विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत उपस्थित राहत विश्वनाथ महाडेश्वर यांचं अभिनंदन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे आभार मानत शिवसेनेवरील ही निष्ठा, शिवसेनेची ही ताकद, अशीच कायम ठेवा असं आवाहन केलं. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. यानंतर शिवसेनेनं महापालिका ते हुतात्मा स्मारक शक्तिप्रदर्शनदेखील केलं. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि ठाकरे कुटुंबियांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन केलं.

blank