महिला दिनानिमित्तचाळीसीतील स्त्रियांचा आहार

0
24

आयुष्यातील वये सरतासरता स्त्री चाळीसीत प्रवेश करते. या कालावधीत सर्व गोष्टींमध्ये स्थिरता आलेली असते. या कालावधीत शरीराची चयापचयाची गती मंद झालेली असते. त्यामुळे शरीरावर मेद जमा होवू लागते व शरीर बेढप व बेडौल दिसायला लागते व त्यामुळेच हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, ॲनेमिया, संधीवात यासारखे विकार आपले डोके वर काढावयास लागतात. तसेच पुढील काही वर्षात रजोनिवृत्ती काळ जवळ आलेला असतो त्यामुळे शरीरातील हार्मोन असंतुलीत होत असतात व शरीरात विविध शारीरीक व मानसिक बदल होत असतात. ‘‘स्वस्थ मन स्वस्थ शरीरात निवेश करतेङ्कङ्क मानसिक आरोग्य बिघडले की डोकेदुखी, अपचन, मानसिक एकाग्रता नष्ट होते. शरीर कमजोर होते, कमजोरीमुळे राग व चिडचिडेपणा येवू लागतो व यामुळे पोटाचे विकार जसे- ॲसिडीटी वाढणे, बध्दकोष्टता असे त्रास उदभवतात.
या सर्वावर उपायासाठी डॉक्टरांकडे धाव घेतो, भरपूर पैसा खर्च करतो. यापेक्षा झठएतएछढखजछ खड इएढढएठ ढकअछ उणठए या म्हणीप्रमाणे वागायला हवे. या सर्वांवर उपाय हा आपल्या स्वयंपाक घरातच आहे मग इकडे तिकडे का धावता… ‘‘तुम्ही तर किचनच्या सम्राज्ञी आहातङ्कङ्क किचनच्या चाब्या आपल्याच हातात आहे. फक्त पोषक आहार म्हणजे काय व त्याचा कशाप्रकारे उपयोग करावा हे तुम्हाला कळले की तुम्ही स्वत:चे व सर्व परिवाराचे आरोग्य सुदृढ ठेवू शकता. आपल्या दैनंदिन आहारात विविध प्रकारचे तृणधान्ये, कडधान्ये व डाळी, हिरव्यापालेभाज्या, फळभाज्या, फळे दुध व दुधाचे पदार्थ, अंडी मास मटन मासे, कमी प्रमाणात साखर तेल व तेलबीया या सर्व अन्न पदार्थाचा वापर करुन आहार तयार करावा यातून शरीराला लागणारी संपूर्ण पोषक घटक प्रथिने, कार्बोदके, स्निग्धे, कॅलरीज, जीवनसत्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ प्राप्त होताच व यालाच समतोल आहार म्हणतात.चाळीसीनंतर आहारात कॅल्शियम, लोह, प्रथिने, फोलीक ॲसीडची गरज वाढलेली असते. कॅल्शीअमच्या अभावाने हाडे खडूसारखी ठिसूळ होतात. पडले की लगेच फ्रॅक्चर होते. त्यामुळे आहारात दुध, दही, दुधाचे पदार्थ, पनीर, हिरव्या भाज्या, नाचणी, सुकामेवा, अंडी, खसखस, तीळ, राजमा, राजगीरा, पदीना, कडीपत्ता, बदाम, सोयाबीन, गाजर, शेवग्याची पाने यासारख्या पदार्थाचे सेवन करावे. तसेच कॅल्शीअमच्या शोषणासाठी जीवनसत्व डी ची गरज असते. म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे, अंडी, मासे, दुधाचे पदार्थ खावे. यामुळे संधीवात पासून बचाव होतो.
रक्तक्षय व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोह, तसेच हृदयरोग कॅन्सर आजारपणची संभाव्यता कमी होण्यासाठी फोलीक ॲसिडयुक्त पदार्थाचे सेवन करावे. यामध्ये गर्द हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, पेनखजूर, गुळ शेंगदाणे, फुलगोबी, मुळ्याची पाने, शेपू, अळीव, बीट, गाजर, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, सुकामेवा, मास, मटन याचा आहारात समावेश करावा व लोहाच्या शोषणासाठी विटॅमीन सी ची गरज असते. यासाठी आंबट फळे निंबू, संत्री, आवळ्याचे रोजच्या आहारात सेवन करावे.रक्तभिसरण व मेंदूचे कार्य उत्तम राहण्यासाठी विटॅमीन बी १२ ची गरज असते. याच्या कमतरतेमुळे त्वचा फिक्की होते. कमजोरी, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, घबराहट यासारखे त्रास होतात. यामुळे आहारात अंडा, मटन, मासे, दुधाचे पदार्थ घ्यावे. या काळात बध्दकोष्टतेचा त्रास अधिक होतो. आहारात अधिकाधिक तंतुमय पदार्थांचा जसे- सलादसहीत फळे, भाज्या, कोंड्यासहीत धान्ये, अंकुरीत डाळी, ओट, मेथ्यांचा समावेश करावा. रोज कमीतकमी ६ ते ८ ग्लास पाण्याचे सेवन करावे. सकाळी ३० ते ४० मिनिटे फिरावे, व्यायाम करावा. तसेच दिवसातून ४ वेळा थोडाथोडा आहार घ्यावा.चरबीविरहीत मटन, मासे, चिकन, अंडे, कडधान्ये (मटर,शेंगा,डाळी) सुकामेवा आणि तेलबीया, दूध् व दुधाचे पदार्थ यातून प्रथिने प्राप्त होतात. यामुळे शरीरातील पेशीची झीज भरुन निघते व नविन पेशीची निर्मीती होते. मासे, अक्रोड, ऑलीव्ह, ऑईल, जवस यातून ओमेमा ३, ओमेगा ६ फॅटी ॲसिड प्राप्त होते व ते हृदयरोगापासून संरक्षण करते.
ग्रामगीतेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे की, ‘‘पवित्र मित आहार निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर बोलता चालता ङ्कङ्क म्हणजे आहार गरजेइतका आणि शुध्द स्वरुपाचा असावा. त्यामुळे मनाला शांती मिळते व कार्य करतांना चेहऱ्यावर प्रसन्न्ता राहते. अशाप्रकारचा समतोल व सकस आहाराचा समावेश स्त्रियांनी आपल्या रोजच्या आहारात करावा व रोगविरहीत आयुष्य जगावे
– शिल्पा आंबेकर (आहारतज्ञ)
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया