गोरेगाव,दि.09ः- गेल्या दोन वर्षापुर्वी अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित गोरेगाव नगरपंचायतीच्या विकास कामात कुठेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तेथील सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी राजकीय मतभेद बाजूला सारुन काम सुरु केले आहे.त्यातच विविध योजनेअंतर्गत अखर्चित शासनाचा 3 कोटी रुपयाचा निधी नगरपंचायतीने काही अडचणीमुळे आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये खर्च न केल्याने तो अखर्चित होता.त्या निधीला विकास कामात वापरण्यासाठी मंत्रालयातील नगरविकास विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी तो निधी मार्च 2018पर्यंत खर्च करण्यास मुदतवाढ मिळवून दिल्याने येत्या चार पाच महिन्यात 3 कोटीच्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती नगरसेवक सुरेश रहागंडाले यांनी दिली आहे.





