24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ प्रविण भोंदेची ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या भंडारा जिल्हा युवा आघाडी महासचिवपदी निवड

प्रविण भोंदेची ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या भंडारा जिल्हा युवा आघाडी महासचिवपदी निवड

0
34

भंडारा,दि.09ः- येथीलओम साई मंगल कार्यालय भंडारा येथे पार पडलेल्या ‘भंडारा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या भंडारा जिल्हा युवा आघाडी महासचिवपदी प्रविण भोदे यांची निवड करण्यात आली. त्या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य आयोजक राम नेवले मुख्य अतिथी अरूण केदार, अरविंद देशमुख, सौ.विजया थोटे त्यावेळी प्रामुख्याने उपस्थीत होते. समितीचे मुख्य आयोजक राम नेवले यांनी प्रविण भोंदे यांची नियुक्ती केली.
बैठकीला उपस्थीत केंद्रीय कोर कमेटी सदस्य तथा माजी आमदार अॅड. आनंदराव वंजारी, केंद्रीय कोर कमेटी सदस्य तथा माजी आमदार मधुकर कुकडे जिल्हाध्यक्ष वासुदेवराव नेवारे, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर क्षिरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष अर्जून सुर्यवंशी, कोर कमेटी सदस्य गोविंदराव चरडे कोर कमेटी सदस्य प्रभु तईकर, जिल्हा सचिव के.एन नान्हे, जाधवराव साठवने, प्रेमलाल लांजेवार, सौ. रेणूका धकाते, मंजुषा बुराडे, संगीता धांडेकर व अादि बहूसंख्य विदर्भवादी कार्यकर्तेानी त्यांचे अभिनंदन केले आहे.