25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ बांधकाम मंत्र्यानी केली अर्जुनी मोरगावात खड्ड्यांची पाहणी

बांधकाम मंत्र्यानी केली अर्जुनी मोरगावात खड्ड्यांची पाहणी

0
37

अर्जुनी मोरगाव,दि.19ः-राज्याचे सार्वजनिक बांधकाम चंद्रकांत पाटील यांचे आज गोंदिया जिल्ह्यात सकाळी आगमन झाले असून त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यात पोचताच अर्जुनी मोरगाव जवळ सुरु असलेल्या खड्डेमुक्त रस्ते अभियानातील खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली.पाटील यांनी खड्यांची पाहणी केली असली तरी तांत्रिकबाबीनुसार खरोखरच खड्डा व्यवस्थित भरला आहे की नाही हे अभियंत्यांनी त्यांना सांगतिले की नाही कुणास ठाऊक मात्र खड्डेमुक्त अभियानाची पाहणी करण्यासाठी पुर्व विदर्भात फिरत असलेल्या बांधकाम मंत्र्यांचा दौरा मात्र खड्डे भरलेल्या रस्त्यानेच होणार हे विशेष ठरले आहे. अर्जुनी मोरगाव येथे आगमन होताच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता गाणार,अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अभियंता सोनुने ,शाखा अभियंता रमण मिश्रा आणि खड्डे बुजविण्याचे काम करीत असलेले कंत्राटदार होमराज पुस्तोडे हे बांधकाम मंत्री खड्ड्याची पाहणी करीत असताना हजर होते.पुस्तोडे यांना अधिकृत कंत्राट नसून सुधीर मानकर यांच्या नावे हे कंत्राट आहे.