26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय खासदार राजू शेट्टी- राहुल गांधींची दिल्लीत भेट

खासदार राजू शेट्टी- राहुल गांधींची दिल्लीत भेट

0
30

मुंबई,(वृत्तसंस्था),दि.19- हतकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे 2019 साली यूपीए आघाडीसोबत असतील अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवी दिल्लीत केली. अशोक चव्हाण यांनी राजू शेट्टी यांच्यासमोर ही घोषणा केली. राजू शेट्टी यांची शेतक-यांबाबतची धोरणे आमच्याशी मिळती-जुळती आहेत त्यामुळेच आम्ही त्यांचे यूपीएमध्ये स्वागत करतो असे चव्हाण यांनी म्हटले.

खासदार राजू शेट्टी यांनी आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते.UPA मध्ये प्रवेश केल्याबाबत खासदार राजू शेट्टी म्हणाले, आज मी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. पुढील आठवड्यात दिल्लीत होणा-या शेतकरी परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. शेतक-यांसाठी मी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय होऊ शकतो. मला संघर्ष नवीन नाही. मात्र, कार्यकर्त्यांशी लवकरच चर्चा करून निर्णय घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटते त्यांचा सुर्य कधीच मावळणार नाही. मात्र, सुर्योदयानंतर सुर्यास्त होत असतो, हे त्यांना माहित नाही.

blank