26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ चंद्रपूर-नागपूर बसला अपघात; तीन जण गंभीर

चंद्रपूर-नागपूर बसला अपघात; तीन जण गंभीर

0
30

वर्धा,दि.19: चंद्रपूरहून नागपूरकडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस वर्धा जिल्ह्यातील नारायणपूरजवळ सोमवारी सकाळी अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली. या बसमध्ये ५० प्रवासी होते त्यापैकी १६ जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघेजण गंभीररित्या जखमी असून त्यांना हिंगणघाट येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बाकी जखमींवर नंदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात आहेत. बसचा चालक बेशुद्ध असल्याने हा अपघात कसा झाला ते स्पष्ट झालेले नाही.

blank