29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता पेट्रोलिंग करणार्‍या पोलिस कॉन्स्टेबलवर लोखंडी रॉडने हल्ला

पेट्रोलिंग करणार्‍या पोलिस कॉन्स्टेबलवर लोखंडी रॉडने हल्ला

0
19

अमरावती,दि.04ः- अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सोमवारी रात्री पोलीस कर्तव्यावर असलेली अधिकारी शुभांगी ठाकरे यांनी या सात ते आठ आरोपींना दारू पिताना बघितले असता काहीजण तिथून पळाले, तर काहींना पोलिसी खाक्या दाखविला व काही वेळा नंतर सोडून देण्यात आले. या आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचा राग मनात धरून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे हिचा पाठलाग केला. पण त्या पहाटेपर्यंत या आरोपींना कुठेच गवसल्या नाहीत. त्याचवेळी पोलीस स्टेशनमधून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचारी सहा. पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चुणीलाल पटेल (५२) यांना अडवून रॉड व सलाखीने डोक्यावर वार केले. यामध्ये शांतीलाल पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच यातील तीन कुख्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक आरोपींचा शोध घेतला जात आहे.

blank