34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ पवार प्रगतीशील मंचच्यावतीने शनिवारला शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन

पवार प्रगतीशील मंचच्यावतीने शनिवारला शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन

0
19

गोंदिया,दि.23: पवार प्रगतीशील मंच गोंदियाच्यावतीने २७ ऑक्टोबर ला शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन पवार सांस्कृतीक भवन कन्हारटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत सकाळी १० वाजेपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक़्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अध्यक्षस्थानी पवार प्रगतीशील मंचचे माजी अध्यक्ष ललीत रहांगडाले राहणार आहेत. उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनqसह कटरे, तर स्वागताध्यक्ष म्हणून पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ. कैलाशचंद्र हरिणखेडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे, गोरेगावचे सभापती माधुरी टेंभरे, गोंदियाच्या सभापती माधुरी हरिणखेडे, शिक्षक अजय रहांगडाले, विस्तार अधिकारी विनोद चौधरी, सेल टॅक्स कॉलनीचे एफ.सी. पटले, प्रदीप ठाकरे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर या कार्यक्रमात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मनोज रहांगडाले, राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे, जनसंवाद सचिव डॉ. प्रा. संजीव रहांगडाले, सदस्य अ‍ॅड. रुपेंद्र कटरे व डॉ. प्रिती देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गुणवंत विद्याथ्र्यांना स्व. देवूभाऊ तुरकर, स्व.बी.एम.पटेल, स्व. रामचंद्र हरिणखेडे, स्व. मुन्नालाल चव्हाण व स्व. देवेंद्रभाऊ बिसेन स्मृती पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत. कार्यक़्रमाच्या आयोजनासाठी पवार प्रगतीशील मंच, पवार नवयुवक समिती, पवार महिला समिती सहकार्य करीत आहे.

blank