
मृतांमध्ये अरुणा मोहनकर (वय- ४५,रा.तुमसर), कल्पना सरोदे (वय- २६,कवलेवाडा), वंदना गोपाले ( वय- ४०) यांचा समावेश असून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टरला ताब्यात घेत इतर जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथून प्रवासी घेऊन जीप (क्र. एम.एच. ३६-४२४७) मंगळवारी सकाळी तुमसरकडे येत होती. नाकाडोंगरीजवळील राजापूर येथील वळणावर चालकाचे जीपवरील नियंत्रण गेले आणि जीप रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात जीपमधील तीन प्रवाशी जागीच ठार झाले. तर 9 प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तुमसर येथे रवाना करण्यात आले. तुर्तास जखमींची नावे कळू शकली नाही. विशेष म्हणजे राजापूरच्या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहे.





