25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News नरभक्षक वाघाणे घेतला दुसरा बळी

नरभक्षक वाघाणे घेतला दुसरा बळी

0
20

अमरावती, दि. 23  : जिल्ह्यातील अंजनसिंगी येथील शेतकरी मोरेश्वर वाळके हे सोमवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चारा आणायला गेले असता बेपत्ता झाले होते. त्यांची सायकल व चारा सापडला सापळल्याने परिसरात खळबळ उडाली असून मोरेश्वरराव बेपत्ता झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते . वाघाच्या भीतीने अंजनसिंगि परिसरातील अनेक नागरिक वाघाच्या दहशतीखाली जागरण करून रात्र काढत होते.वाळकेचा शोध घेण्यासाठी सकाळच्या सुमारास वन विभागाने शोध मोहीम सुरू केली असता राठी यांच्या शेतजवळ त्याचा मृतदेह आढळला.मृतदेहाची अवस्था पाहून हा वाघाने हल्ला केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.