35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा-खा.मधुकर कुकडे

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा-खा.मधुकर कुकडे

0
25

blank

साकोली,दि.04ः- भंडारा व गोंदिया हे दोन्ही जिल्हे धानासाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही जिल्ह्यात धानाचे मोठय़ा प्रमाणात पिक घेतले जाते. धानाला पाण्याची नितांत गरज आहे. मात्र यावर्षी निसर्गाने साथ सोडली. त्यात भारनियमनाचा फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून सरकारने दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खा. मधुकर कुकडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महासचिव धनंजय दलाल, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. वानखेडे, अविनाश ब्राम्हणकर, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे, माजी सभापती मदन रामटेके, समरीत, प्रभाकर सपाटे, शैलेश गजभिये, प्रविण भांडारकर, प्रदिप मासूरकर आदी उपस्थित होते.
खा. कुकडे म्हणाले, धानाला अखेरच्या टप्प्यात पाण्याची गरज होती. शेतकर्‍यांनी कसेतरी पिक वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, एका पाण्याने धान करपलेच. पावसाळ्यातही आठ तास विज पुरवठा सुरू होता. शासनाकडे मागणी करुनही भारनियमन बंद केले नाही. ३१ ऑक्टोबरपर्यंत १२ तास विजपुरवठा करण्यात येणार होता. मात्र वेळेआधीच चार तास पुन्हा कमी करण्यात आले. त्यामुळे धानपिक करपले. शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी शासनाने भंडारा-गोंेदिया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

blank