कनेरी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ थाटात

0
13

सडक अर्जुनी,दि.04ः-तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था कनेरी/राम येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ मोठय़ा थाटात पार पडला. या कार्यक्रमाचा शुभारंभ आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतभाऊ दुधनाग यांच्या हस्ते आ.संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार रामरतनबापू राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी राजेश नंदागवळी, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, इंजि.अनंतकुमार जांभुळकर, डॉ. बबन कांबळे, नेतराम देशमुख, उपप्रादेशिक व्यवस्थापक पाटील, उपसरपंच शिवाजी गहाणे, शंकर मेंढे, उपसरपंच योगेश खोटेले, तंमुस अध्यक्ष तवाडे, सरपंच वैद्य, संचालक सुर्यानंद घरत, आकोजी रहिले, वासुदेव पाटील, संस्थेचे सचिव वाय. ए. मलये, उपसरपंच धनराज आसटकर, निकेश उके, मंगेश गहाणे, धनलाल शेंडे, गेंदलाल चुटे, पदमाकर नेवारे, नोमेश्‍वर कुरसुंगे, सिंधू कोरचे, खुलचंद चौरे, गेंदलाल मेर्शाम,अशोक कुरसुंगे, गजानन तवाडे, छोटू मेर्शाम, ओमप्रकाश टेंभुर्णे, बिरला गणवीर, अनिल मुनेश्‍वर, अशोक इळपाचे, मुन्ना देशपांडे,मोरेश्‍वर मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष ईश्‍वर कोरे यांनी तर संचालन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य जागेश्‍वर धनभांते यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.