आमगाव दि.१६ :: आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींच्या जीवनातील संघर्ष वेचून त्यांच्या कल्याणासाठी मार्गक्रम करणारे नागरिक अद्यापही पडद्याआड आहेत. सामाजिक बांधिलकीतून आर्थिक दुर्बलांची सेवा करण्याचे ध्येयच त्यांच्या उत्थानाचा शिखर गाठू शकतो, असे मत आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी युवा शक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित भाऊबीज व दीपउत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
भाऊबीज व दीपउत्सव कार्यक्रमात बिंजवार लोकवस्ती, गोंड लोकवस्ती, बेदाळी व प्रभाग तीनमधील विधवा, विभक्त व परितक्त्या आर्थिक दुर्बल महिलांसाठी ओवाळणीच्या माध्यमातून भेटवस्तू, मिठाई देऊन बहिणींचा सन्मान करण्यात आले. लोकवस्तीत दीपउत्सव व भाऊबीज फटाके फोडून साजरा करण्यात आला. यावेळी ज्योती खोटेले, वर्षा शर्मा, उत्तम नंदेश्वर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक यशवंत मानकर यांनी केले. संचालन रितेश अग्रवाल यांनी केले तर आभार राजीव फुंडे यांनी मानले. यशस्वितेसाठी भुवन सलामे, सोनू पशिने, राजेश मानकर, लक्की मानकर, दीपक अग्रवाल, नूपुर स्वरा मानकर, मनोज चुटे, विनोद चुटे, संजय खोटोले यांनी सहकार्य केले. .





