भंडारा,दि.१६ : जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लि. व जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीने संचालक भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करून फरार झाले आहे. या संचालकांना अटक करण्यात यावी, या मागणीला धरून ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. .
मात्र अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांनी अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही व ठेवीदाराची रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे ठेवीदारांना हुतात्मा स्मारक चौक भंडारायेथून विष्णुदास लोणारे, कन्हैया नागपुरे, मधुकर येरपुडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यात गावा-गावातून गुंतवणुकीदारांनी सहभाग घेतला होता.यावेळी जिल्हाधिकारी शंतनु गोयल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात ठेवीदारांची रक्कम तत्काळ देण्याची कारवाई करावी, फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात यावी, मागणी पूर्ण न झाल्या येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील ठेवीदार बहिष्कार घालतील. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरण समजून अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून तत्काळ माहिती घेऊन पुढील कारवाईसाठी शासनाला पाठपुरावा करतो व लवकरात लवकर रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात डॉ. राजकुमार बावनकर, ममता सांडेल, अनिल मूर्ती, नलु सेलोकर, ममता साखरे, केशोराव बिसने, ज्ञानेश्वर गजभिये, फुलवंता कोकुडे, जागृती गजभिये, मंगला सातके, अरविंद प्रधान, पूष्पा पटले, जगदिश जनबंधु, लेकचंद लुसेसरी व अन्य ठेवीदार सहभागी झाले होते..




