25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता संख ते विजापूर मार्गावर दुचाकीच्या अपघात दोघांचा मृत्यू

संख ते विजापूर मार्गावर दुचाकीच्या अपघात दोघांचा मृत्यू

0
30

संख (ता.जत ),दि.20ः-  येथे 20 डिसेंबर पाहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान संख ते विजपूर दरम्यानच्या रस्त्यावर आज 20 डिसेबंरच्या पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घटना घडली.दुचाकीस्वार हे(एम.एच.१० बी.टी.२१९२)या वाहनाने जात असताना नियंंत्रण सुटल्याने अपघात होऊन वाहनावरील दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला.मृत व्यक्तीचे नाव सुहास दशरथ गंभिरे  ( रा.रामकृष्ण नगर ,कुपवाड,वय 29) असे असून ते मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्र सांगली जिल्हा उपाध्यक्ष होते.तर दुसऱ्या मृत व्यक्ती चे नाव भालचंद्र सिद्राम तिगनीबिद्री असे नाव आहे .वय ३२ वर्षे (रा.दत्तनगर ,बामणोळी ,सांगाली – मिरज) असे आहे.संख पासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर मध्यमप्रकल्पाकडे जाणारा रस्ता विजपूर कडे जातो.अधांर असल्यामुळे भरधाव दुचाकीस्वराचा ताबा सुटल्याणे वळणावर ही घटना घडली. घटनास्थळी उमदीचे पी.एस.आय .दाडगे, संखचे ए.एस.आय.कोळी ,एस.एम.करांडे यांनी पोचून तपास सुरु केला.