26.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय ना. बडोले आज जिल्ह्यात

ना. बडोले आज जिल्ह्यात

0
25

गोंदिया,दि.२१ : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले हे शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. दौयऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून सकाळी ११ वाजता कोहमारा येथील बांबु डेपो येथे जनधन वनधन वनउपज केंद्राचे उद्घाटन करतील. दुपारी १२ वाजता कोहमारा येथे शेतकरी राईस मिलचे उद्घाटन केल्यावर १ वाजता गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पदाधिकाऱ्यांंसोबत बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता गोरेगाव येथे आयोजित महिला कौशल विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहतील. तर सायंकाळी ५ वाजता सडक अर्जुनी येथे आयोजित सीएम चषक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित राहतील.