आमगावला रेल्वेचा थांब्यासह उड्डाण पुलाचे रेल्वेमंत्र्याना निवेदन

0
8

आमगाव(पराग कटरे),दि.२१ः-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव तालुका महत्वाचे ठिकाण असून सर्वात मोठी बाजारपेठ सुध्दा आहे.मुंबई-कोलकत्ता रेल्वेमार्गावरील गाव असून रेल्वेस्थानक सुध्दा आहे.येथूनच देवरी व मध्यप्रदेशातील लांजी याठिकाणच्या प्रवाशाना हे जवळचे रेल्वेस्थानक आहे.मात्र या स्थानकावर अनेक महत्वाच्या गाड्यांना थांबा नाही.त्यातच गोंदिया-आमगाव मार्गावरील किडंगीपार व आमगाव -देवरी मार्गावरील बाम्हणी जवळील रेल्वेफाटकामूळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने या दोन्ही ठिकाणी तातडीने उड्डाणपुलाचे काम सुरु करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथील रेल्वेमंत्रालयात भेट घेऊन मागणी केली.यावेळी आमगाव शहर भाजप अध्यक्ष घनश्याम अग्रवाल,पिंटू अग्रवाल,रविंद्र भांडेकर आदी उपस्थित होते.या निवेदनात आमगाव स्थानकावर दरभंगा एक्सप्रेस,जनशत्बादी एक्सप्रेल,गोंदिया-दुर्ग मार्गावर दुपारी लोकल डेमू सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.