26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home क्रीडा कोकणा येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उदघाटन

कोकणा येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उदघाटन

0
24

सडक अर्जुनी,दि.12ः- तालुक्यातील कोकणा येथे शेतकरी संमेलन व कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा थाटात पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती अविनाश काशिवार होते. तर मार्गदर्शक म्हणून डॉ. गिरिष निखारे, जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर गटनेते,जि.प.सदस्य किशोर,रमेश चु-हे, दिपक वैद्य, रजनी गि-हेपुंजे, मंजुताई चंद्रिकापुरे, लता चांदेवार, सरिता कापगते, सरपंच डि.यु.रहांगडाले, दिनेश कोरे, वंदना थोटे, सुभाष कापगते, शिवाजी गहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.