राजभक्षर जमादार,तासगाव-,दि.28ः– सावळज येथील शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय नेमीनाथनगर,सांगली येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती आदर्श शाळा पुरस्कार देऊन या शाळेला गौरविण्यात आले.अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी सांगली,शमरावजी जवंजाळ राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, संगीता खोत महापौर म न पा सांगली, सभापती स्नेहल सावंत, प्राचार्य डॉ. विकास सनगर,गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, संतोष कदम, बी एस रामदुर्ग सी ई ओ डी सी सी बँक सांगली,व प्रल्हाद हुवाळे,यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
मुख्याध्यापिका कुंभार मॅडम, रेवणसिद्ध होनमोरे, एस एम सी अध्यक्ष, सदस्य,पालक,ग्रामस्थ यांनी हा पुरस्कार स्विकारला.शिवाजीनगर शाळेने संगीतमय परिपाठ, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, उपस्थिती ध्वज,इंग्रजी आशय समृद्धी, इंग्रजी वाचन,शालेय बाग, वृक्षारोपण, वृक्षसंर्धन,ज्ञानरचनावाद,आठवडा बाजार, संयुक्त शैक्षणिक सहल असे अनेक उपक्रम शाळेने राबविले आहेत.यावेळी भिमराव पवार, शंकर पाटील,शिवाजी जाधव, बाळासाहेब जाधव,बी एस पाटील,नंदकुमार ढवळे, दीपक पवार,विनायक पवार, शरद पाटील,सिद्राम पोळ,शंकर महाले उपस्थित होते.सर्व नागरिक शाळेचे कौतुक व अभिनंदन करत आहेत





