
गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.28ःःगडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा/-उसेगाव जंगलात वाघाच्या हल्लात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायकांळच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.गावाशेजारील जंगलात पांडुरंग सयाम व कुसन कापगते हे गुरु चारण्यासाठी 27 जानेवारीला गेले होते.दरम्यान सायकांळच्या सुमारास पांडुरंग सयामवर वाघाने हल्ला करुन फरफटत जंगलात नेले.सायकांळी गावात परतल्यावर कापगते यांनी माहिती दिल्यानंतर रात्रीला वनविभागाच्या पथकासोबत शोधमोहीम राबविण्यात आली,मात्र सयाम यांचा पत्ता लागला नाही.परत आज सकाळी शोध मोहीम हाती घेतली असता सकाळी 7 वाजेच्या सुमारास जंगलात पांडुरंग सयाम यांचा मृतदेह आढळून आला.गेल्या दोन तीन वर्षापासून या परिसरात वाघाचे वास्तव्य असून या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे.सदर मृत व्यक्तीच्या कुटुबियांने आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यानी मदतीची घोषणा केली.





