पालकमंत्र्याच्या नावावर रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ,स्ट्रेचरवरच अडकला अपघाती रुग्ण

0
8

देवरी,दि.28ः- गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा आदिवासी तालुका.या भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात आणि त्यांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी शासनाने देवरी येथे ट्रामा केयर सोबतच ग्रामीण रुग्णालय सुरु केले.परंतु येथील रुग्णालयाचा कारभार नेहमीच विविध विषयाने चर्चेत आलेला आहे.आजही तसाच काही प्रकार बघावयास मिळाला.येथीलच ब्लाॅसम शाळेचे शिक्षक चंद्रकांत बघेेले यांचा अपघात झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.त्यांची तपासणी केल्यावर त्यांन सीटी स्कॅन करण्यासाठी गोंदियाला हलवावे लागेल असे वैद्यकिय अधिकार्यांनी सांगितले.मात्र जखमी रुग्णाला सीटीस्कॅनसाठी गोंदियाला नेण्यासाठी मात्र ग्रामीण रुग्णालयात असलेली रुग्णवाहिका देण्यास डाॅ.श्रीपात्रे यांनी नकार देत ती रुग्णवाहिका देवरी तालुक्यात कार्यक्रमासाठी येत असलेल्या पालकमंत्री व वित्तमंत्र्यासाठी आहे तुम्हाला मिळणार नाही या शब्दात आरोग्य सेवेचेच धिंडवडे काढले.त्यातच रुग्णालयाचा प्रवेशद्वारावरच 2 तास स्ट्रेचरवरच त्या रुग्णाला ठेवण्यात आले.त्यानंतर रुग्णाजवळच्या मित्र व नातेवाईंकानी चिचगड व सडक अर्जुनी येथील 108 रुग्णवाहिका बोलावून तुम्ही घेऊन जा असे उद्दठ उत्तर देत आरोग्य सेवेच्या धर्मालाच तिलांजली देण्याचे काम केल्याने सदर वैद्यकिय अधिकायावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.