24.4 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home राजकीय ना. गडकरी, ना. फडणवीस, मुनगंटीवार, अहीर १८ ला गडचिरोलीत

ना. गडकरी, ना. फडणवीस, मुनगंटीवार, अहीर १८ ला गडचिरोलीत

0
29

गडचिरोली,दि.१६ः- जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षात पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व नव्याने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम व कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शासकीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे व कठाणी नदीवरील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलाचे, आरटीओ कार्यालयाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच गडचिरोली तालुक्यातील कोटगल सिंचन प्रकल्पाचे व इतर विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे.
लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण नागरिक तथा भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राच्यावतीने करण्यात आले आहे

blank